घरमहाराष्ट्रमहागड्या रेसर गाड्या चोरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना अटक

महागड्या रेसर गाड्या चोरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना अटक

Subscribe

महागड्या रेसर गाड्या चोरणाऱ्या तरुणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून ८ लाख ५० हजार रुपयांच्या ७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

महागड्या रेसर गाड्या चोरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना गुन्हे शाखा १ ने जेरबंद केलं आहे. आरोपींकडून ८ लाख ५० हजार रुपयांच्या ७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलं असून अतिक वाहिद शेख (वय १९), वाशीम वाहिद शेख (वय २१), राजेश दत्तात्रेय भोसले (वय २०), प्रविण उत्तम कांबळे (वय १९) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या आरोपींमधील शेख आडनाव असलेले आरोपी हे सख्खे भाऊ आहेत. गाड्या चोरून महाविद्यालयात घेऊन जात आणि घरी परत येत असताना वेगवेगळ्या सोसायटीमध्ये चोरीच्या गाड्या लावत अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.

बातमीदारामार्फत आरोपींची मिळाली माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त सुरू करण्यात आली होती. तेव्हा पोलीस कर्मचारी विजय मोरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सांगवी, येरवडा, लोहगाव येथे बनावट नंबर प्लेटच्या रेसर गाड्या असून त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्याचं सांगण्यात आलं.

- Advertisement -

मौज-मज्जा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी महागड्या गाड्या चोरत

पोलीस उपनिरीक्षक लांडगे यांचे पथक हे आरोपींच्या मागावर गेले आणि संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून महागड्या रेसर, आणि मोपेड दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरच्या दुचाकी या निगडी, दिघी आणि येरवडा येथून चोरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपी हे मौज-मज्जा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी महागड्या गाड्या चोरत असे. दरम्यान, महाविद्यालयातून आल्यानंतर संबंधित दुचाकी या वेगवेगळ्या सोसायटीमध्ये लावत किंवा मित्रांच्या घरी ठेवतं असे.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, प्रमोद लांडे, शिवाजी कानडे, मनोजकुमार कमले, विजय मोरे, गणेश सावंत, प्रवीण पाटील, यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -