घरमहाराष्ट्रतृप्ती देसाईंना चॅलेंज देणारी शिवसेना कार्यकर्ती पोलिसांच्या ताब्यात!

तृप्ती देसाईंना चॅलेंज देणारी शिवसेना कार्यकर्ती पोलिसांच्या ताब्यात!

Subscribe

संतती संदर्भातील विधानावरून वादात सापडलेल्या निवृत्ती महाराज इंदुरीकर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या ‘भुमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांना चॅलेंज देणाऱ्या शिवसेनेच्या स्मिता अष्टेकर यांना नगर पोलिसांनी सुपे टोल नाक्याजवळ ताब्यात घेतले आहे.
किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटण्याकरिता तृप्ती देसाई मंगळवारी नगरमध्ये येणार होत्या. देसाई यांना ‘नगर जिल्ह्यात पाय ठेवून दाखवाच’, असे आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता अष्टेकर त्यांना रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सरहद्दीवर जात असतांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
इंदुरीकर महाराजांनी एका पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केल्यानंतर देखील तृप्ती देसाई यांनी आपली मागणी कायम ठेवली आहे. सोमवारी अनिसच्या ऍड. रंजना पगार गवांदे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईदेखील मंगळवारी नगरमध्ये येणार होत्या. इंदुरीकर यांच्या दिलगिरीनंतर यावरून राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

‘महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, किर्तनकार, शिक्षक, शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मातासमान असलेला तमाम महिला वर्ग. गेल्या आठ दिवसांपासून माझ्या किर्तनाच्या सेवेतील त्या वाक्यामुळे सोशल मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासह इतर समाज माध्यमात माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून माझ्या २६ वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाज संघटन, अंधश्रध्दा निर्मुलन व विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या किर्तनरुपी सेवेतील त्या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -