घरमहाराष्ट्रगुन्हेगारांऐवजी पोलीस कुत्र्याच्या शोधात

गुन्हेगारांऐवजी पोलीस कुत्र्याच्या शोधात

Subscribe

पुण्यातील सांगवी पोलीस ठाण्यातील पोलिसांवर गुन्हेगारांना सोडून कुत्र्याला शोधण्याची वेळ आली आहे.

सांगवी पोलीस ठाण्याच्या पोलिसांवर गुन्हेगार सोडून कुत्रा शोधण्याची वेळ आल्याचा अजब प्रकार पाहायला मिळत आहे. सांगवी येथे राहणाऱ्या एका मालकिणीने सांगवी पोलीस ठाण्यात कुत्रा हरवल्याची लेखी तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे आता सांगवी पोलीस कुत्रा शोधत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नेमके काय घडले?

नवी सांगवी परिसरातील एका घरातून लॅब्राडोर जातीचा कुत्रा चोरांनी पळवून नेला असल्याची लेखी तक्रार मालकिणीने केली आहे. त्यामुळे आता गुन्हेगारांच्या मागावर असणाऱ्या पोलिसांवर कुत्रा शोधण्याची वेळ आली आहे. या कुत्र्याला शोधण्यासाठी सांगवी परिसरात चौकाचौकावर लावण्यात आलेले सीसीटीव्हीचे फुटेज तपासत आहेत.

- Advertisement -

असे आहे कुत्र्याचे वर्णन

हा कुत्रा लॅब्राडोर जातीचा असून त्याचा रंग तपकिरी आहे. या कुत्र्याचे वय चार वर्षे आहे. तक्रारदार महिलेला या कुत्र्याचा जास्तच लळा लागला आहे. या कुत्र्याचा मालकिणीला अधिक लळा असल्याने ही महिला पोलीस ठाण्यात अनेक वेळा कुत्रा सापडला हे विचारण्यासाठी खेटे घालत आहे.

कुत्र्याला शोधण्यासाठी विशेष टीम

कुत्रा अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. मात्र हा कुत्रा पोलिसांना सापडला नाहीतर त्यांना विशेष टीम करुन या कुत्र्याचा शोध घ्यावा लागणार आहे. काही महिन्यांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्यात असाच एक भटका कुत्रा आला होता. तो तीन – चार दिवसांपासून सांगवी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसला होता. त्याचदरम्यान त्याचा मालक देखील कुत्रा हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी कुत्रा आणि त्याच्या मालकाची भेट झाली आणि त्यांना कुत्रा पोलीस ठाण्यात सापडला. त्यानंतर त्या कुत्र्याला त्याच्या मालकाकडे सुखरुप देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -