घरमहाराष्ट्रनितेशच्या अटकेसाठी राणेंच्या घरावर नोटीस

नितेशच्या अटकेसाठी राणेंच्या घरावर नोटीस

Subscribe

अटक टाळण्यासाठी राणेंची धडपड

संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांची अडचण वाढू लागली आहे. नितेश यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला असताना त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी त्यांच्या घरावर नोटीस चिकटवली होती. ही नोटीस राणेंच्या घरी काम करणार्‍या इसमाने काढून घेतली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर स्वत: नितेश राणेंच्या अटकेची दाट शक्यता असून, ही अटक टाळण्यासाठी सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही प्रयत्नांची शिकस्त केली आहे.

केंद्रिय मंत्री नारायण राणेंनी काल पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मूर्ख आहे का? असे वक्तव्य केले होते. त्यावरूनच कणकवली पोलिसांनी आता नारायण राणेंनाही नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकवली पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत. पण त्यांचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. तसेच नितेश राणे नॉटरिचेबल आहेत. संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्गमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. नॉटरिचेबल असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावलीय. बुधवारी तीन वाजता कणकवली पोलीस ठाण्यात त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असे उत्तर दिले होते. ते कुठे आहेत हे मला माहीत असेल तरी मी तुम्हाला का सांगावे? असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी पत्रकारांना उत्तर देताना केला होता. त्याच अनुषंगाने पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. या नोटीसने राणे यांची अडचण वाढली आहे.

जामीन अर्जावरील सुनावणीत केंद्रिय मंत्र्यांच्या या कृतीची दखल घेतली जाण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाले आहे. नितेश राणे यांना अटक करावी, या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसर्‍या बाजूला विधानसभेत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

- Advertisement -

राणेंनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी नोटीस बजावली असावी – गृहराज्यमंत्री
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी राणेंना पाठवलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना माझ्याकडे अधिकृत माहिती नाही, असे म्हटले. संबंधित तपास अधिकार्‍यांनी नोटीस दिली असेल तर तो तपासाचा भाग असू शकतो. नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य सर्वांनीच ऐकले आहे. मला माहिती असले तरी नितेश राणे कुठे आहेत हे कशाला सांगू? असे नारायण राणे म्हणाले होते. त्याबाबत राणेंना नोटीस पाठवली असू शकते, असे शंभूराज देसाई म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -