घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्याचा मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्याचा मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मध्यरात्री मोरवाडी परिसरात घडली असून अभिषेक दळवी (२९), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने मद्यप्राशन केले असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

नेमके काय घडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अभिषेक दळवी, असे २९ वर्षीय मुलाचे नाव आहे. पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून अभिषेक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. अभिषेकचे वडील अनिल दळवी हे पोलीस निरीक्षक असून सध्या ते सांगली जिल्ह्यात कार्यरत आहेत. तर त्यांचं कुटुंबीय हे पिंपरी चिंचवडमध्ये राहत असून अभिषेकचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. तसेच तो आई आणि पत्नीसोबत पिंपरीत राहत होता. दरम्यान, बुधवारी, काल मध्यरात्री बेडरूमचे दार लाऊन तो दारू प्यायला आणि नंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात; १ जण ठार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -