घरमहाराष्ट्रराजकीय हस्तक्षेपामुळे ‘ईडी’ बदनाम

राजकीय हस्तक्षेपामुळे ‘ईडी’ बदनाम

Subscribe

आमदार रोहित पवार यांची केंद्र सरकारवर टीका

राजकीय स्वार्थासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) वापर करणे अयोग्य आहे. कारवाईत सातत्याने राजकीय हस्तक्षेप होत असल्याने नागरिकांमध्ये ‘ईडी’ची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे हे ईडीच्या कारवाईला निश्चित सामोरे जातील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार रविवारी (दि.27) नाशिक दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या आमदारांवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ लक्ष ठेवून आहेत. विरोधकांनी सोशल मीडियाच्या वापरासाठी टीम तयार केली असून, त्याला आर्थिक पाठबळ असल्याची टीकाही रोहित पवारांनी केली. त्यामुळे एखाद्या लहानशा विषयाला वेगळे वळण देऊन सोशल मीडियावर ट्रोल करण्याचे प्रयत्न विरोधक करत असल्याचे ते म्हणाले. केंद्राने कर्जमाफीतसुद्धा राज्यासह शेतकर्‍यांची फसवणूक केली. तसेच राज्य सरकारला ‘जीएसटी’चा वाटा केंद्र सरकार देत नसूनही महाविकास आघाडी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तास्थापनेच्या चर्चेवर बोलताना ‘जे तीन-तीन महिने करीत आहेत, त्या भाजप नेत्यांना पाच वर्षे केव्हा सरतील हे समजणार नाही,’ अशी कोपरखळीही त्यांनी विरोधकांना मारली. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी भाजपला सडेतोड उत्तर देण्यासाठी आपणही स्पष्ट भूमिका घेण्यास सांगितले.

- Advertisement -

राज्यपालांचे अप्रत्यक्ष राजकारण

राज्यपाल नियुक्त आमदारांवर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. याबाबत बोलताना आमदार पवार म्हणाले की, राज्यपाल पदाचा राजकीय हेतूने वापर करण्याचा प्रयत्न होत आहे. हे कार्य लोकांना पटणारे नाही. आमदार नियुक्तीबाबत विलंब होत असल्याने सर्वसामान्य व्यक्तीदेखील आक्षेप घेतात, असे म्हणत रोहित पवारांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -