घरमहाराष्ट्रराजकीय भूमिका वेगळ्या असतात आणि कुटुंब एक असते - सुप्रिया सुळे

राजकीय भूमिका वेगळ्या असतात आणि कुटुंब एक असते – सुप्रिया सुळे

Subscribe

चोरडिया आणि पवार कुटुंब भेटने यात काही नवीन नाही आणि चोरडिया आणि पवार कुटुंब एकच आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिली

मुंबई : “राजकीय भूमिका वेगळ्या असतात आणि कुटुंब एक असतात”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर दिली आहे. सुप्रिया सुळेंनी आर. आर. पाटील यांच्या जयंती निमित्ताने अभिवानद केले. यावेळी सुप्रिया सुळेंनी, चोरडिया आणि पवार कुटुंब, अजित पवार आणि शरद पवार यांची भेट आदी मुद्यांवर माध्यमांशी संवाद साधले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अनेक वेळा राजकीय मतभेद असतात आणि ते लोकशाहीत असलेच पाहिजेत. एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील या शरद पवारांच्या सखी बहिण आहे. पण, शरद पवार आणि एनडी पाटील हे अनेक धोरणांमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे असायचे. त्यामुळे अत्यावरचे आमचे प्रेम किंवा अत्याचे आमच्यावरचे प्रमे कधीच कमी झाले नाही. आम्ही आमचे राजकीय विचार आणि कौटुंबिक ओलावा. यात कधीही अंतर पडू दिले नाही आणि आणणारही नाही. आमच्या कुटुंबाची नाते ही वेगळी आहेत आणि आमची राजकीय मते ही वेगळी आहेत. शरद पवार आणि एनडी पाटील यांचे उदाहरण उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.”

- Advertisement -

दादा आणि पवार साहेबांच्या भेटीमुळे महाविकास आघाडी कुठलेही संभ्रम नाही, पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना केलेल्या प्रश्नावर म्हणाल्या.  “आज संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य आपण ऐकले असते तर कदाचित आपण हा मला प्रश्न विचारला नसता”, असा उलट त्यांनी पत्रकारांना केला.

हेही वाचा – अजित पवार काही मोठे नेते नाहीत, शरद पवार भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

- Advertisement -

चोरडिया आणि पवार कुटुंबियांचे ऋणानुबंध

शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी त्या बैठकीत नव्हते. त्यामुळे बैठकीत काय झाले हे मला माहिती नाही. एक गोष्टी म्हणजे माझ्या आणि दादाच्या जन्माच्या आधीपासून चोरडिया आणि पवार कुटुंबियांचे ऋणानुबंध आहेत. शरद पवार आणि अतुल चोरडियांचे वडिल हे एका कॉलेजमध्ये होते. त्यामुळे चोरडिया आणि पवार कुटुंब भेटने यात काही नवीन नाही. चोरडिया आणि पवार कुटुंब एकच आहोत.”

हेही वाचा – पंतप्रधान मोदी म्हणाले, तीन दुष्प्रवृत्तींशी लढावे लागेल; काँग्रेसने सांगितला – लड़ने का तरीका…

सुप्रिया सुळेंनी दिल्या आबांच्या आठवणींना उजाळा

आर. आर. पाटील यांची जयंती निमित्ताने सुप्रिया सुळेंनी अभिवानद केले. यावेळी सुप्रिया सुळेंनी आबा पाटलांची आठवण सांगताना म्हणाल्या, ” आर. आर. पाटील हे माझे जेष्ठ बंधू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असा एकही दिवस नाही, ज्या दिवशी आबांची आठवण येत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्र एक कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक भाऊ म्हणून एक योगदान केले. हे आम्ही आयुष्यभर कधीच कोणी विसरले नाही. महाराष्ट्राशी एक दशकांपासून असलेले ऋणानुबंध हे महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही. महाराष्ट्रात एका नवीन पिढीला राजकारणात येईचा असेल, कोणत्याही नेत्याचा अभ्यास करून कर्तृत्व पुढे दाखवायचे असेल, आबा पाटलांकडे एक आदर्श नेता, पुत्र, भाऊ, पती यांची आठवण महाराष्ट्र अनेक वर्ष लक्षात ठेवेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -