घरमहाराष्ट्रPolitics: काँग्रेसला धक्का; आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात प्रवेश, रामटेकची जागा लढवणार

Politics: काँग्रेसला धक्का; आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात प्रवेश, रामटेकची जागा लढवणार

Subscribe

मुंबई: काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होताच पारवेंना उमेदवारी मिळाली आहे. रामटेक या लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. (Politics Shock to Congress MLA Raju Parve joins Shinde group will contest Ramtek s seat)

आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात प्रवेश

उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,कृपाल तुमाने आणि आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत शिंदे गटात छोटेखानी पक्षप्रवेश झाला आहे, अशी माहिती राजू पारवे यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे. राजू पारवे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार. त्यांच्या नेतृत्वात आता मी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

शिंदे गटाने दिली ही माहिती

नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी राजू पारवे यांचं पक्षात स्वागत करूनन त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रामटेक मतदारसंघावरून भाजपा- शिवसेनेत रस्सीखेच?

रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने हे सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. रामटेक मतदारसंघावरून भाजपा-शिवसेनेत (शिंदे गट) रस्सीखेच सुरू आहे. भाजपाला रामटेकची जागा हवी आहे पण, अद्याप निर्णय झालेला नाही, असं सांगितलं जात असतानाच राजू पारवे यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Ro-Ro Service Viral Video: वसई-भाईंदर रो-रोमध्ये तरुणांची दारू पार्टी; व्हिडीओ व्हायरल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -