घरमहाराष्ट्रRo-Ro Service Viral Video: वसई-भाईंदर रो-रोमध्ये तरुणांची दारू पार्टी; व्हिडीओ व्हायरल

Ro-Ro Service Viral Video: वसई-भाईंदर रो-रोमध्ये तरुणांची दारू पार्टी; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

मीरा-भाईंदर: मीरा-भाईंदर आणि वसई या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी समुद्रात रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, रो-रो सेवा सुरुवातीपासूनच वादात सापडली आहे. उद्घाटनानंतर काही दिवसांनी रोरो एका पिअरला धडकून अपघात झाला. यानंतर पुन्हा एकदा रो-रोचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणाच्या मद्यधुंद पार्टीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ही RoRo सेवा आहे की पार्टी हँगआउट? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Ro Ro Service Viral Video Youngster s alcohol party in Vasai Bhyander Ro Ro The video went viral)

भाईंदर ते वसई दरम्यान आरोही नावाची रोरो बोट सुरू करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका बोटीत 8 ते 10 जण टेबल, खुर्च्या घेऊन पार्टी करत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय मनोरंजनासाठी भोजपुरी गाणीही वाजवली जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. यामुळे ही रो रो सेवा आहे की पार्टीचे ठिकाण असा प्रश्न निर्माण होतो.

- Advertisement -

व्हिडिओमध्ये दिसणारा मीरा-भाईंदर हा ग्रुप भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांचा समर्थक असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकाराबाबत सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करत असून प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भाईंदर ते वसई या रस्त्याने एक ते पंधरा तास लागत होते. मात्र रो-रो सेवेमुळे प्रवासाच्या वेळेची बचत होत आहे. आता हे अंतर तुम्ही 15 मिनिटांत पार करू शकता. या रो रो बोटीची क्षमता 50 दुचाकी आणि 30 चारचाकी वाहनांची आहे. तसेच, प्रवासी क्षमता 100 पेक्षा जास्त असेल. या रो रो बोटीची किंमत 6.2 कोटी रुपये आहे. वसई ते भाईंदर हे रस्त्याचे सरासरी अंतर 38.20 किमी आहे. मात्र आता एक्स्प्रेस वेपासून हे अंतर केवळ 3.57 किमी असेल. वसई ते भाईंदर दरम्यान नागरिकांसाठी सकाळी 6 ते सायंकाळी 7 या वेळेत रोरो बोट सेवा उपलब्ध असेल. घाटाजवळ प्रवाशांसाठी वेटिंग रूम, प्रसाधनगृहे आणि तिकीट बुकिंग काउंटर उभारण्यात आले आहेत. प्रवाशांना नाष्ट्यासाठी कॅफेटेरियादेखील उपलब्ध आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Maha Politics : भाजपाचा आमच्यावर दबाव…, लोकसभा उमेदवारीबाबत संजय शिरसाटांचे भाष्य)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -