घरताज्या घडामोडीरावेर बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात प्रहारचे उमेदवार, भाजपच्या चिंतेत भर

रावेर बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात प्रहारचे उमेदवार, भाजपच्या चिंतेत भर

Subscribe

रावेर बाजार समितीची निवडणूक येत्या २८ एप्रिलला होणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांकडून आपापल्या उमेदवारांची नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी या निवडणुकीच्या रिंगणात प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गट यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. परंतु आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आपले दहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे भाजपच्या चिंतेत भर पडली आहे.

- Advertisement -

बाजार समितीत यापूर्वी सर्वपक्षीय पॅनल सत्तेत होते. त्यांनी सर्व कामकाज आणि ठराव एकमताने केले होते. आता महाविकास आघाडी आणि भाजप असे दोन स्वतंत्र पॅनल आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारात ते एकमेकांवर काय आरोप करणार याची उत्सुकता आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक चुरस विकास सोसायटीच्या सर्वसाधारण गटात आहे. ७ जागांसाठी येथे तब्बल २३ उमेदवार रिंगणात आहेत. महिला राखीव गटात २ जागांसाठी ४ उमेदवार, इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या १ जागेसाठी २ उमेदवार, अनुसूचित जाती जमातीच्या १ जागेसाठी ५ उमेदवार, ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण गटातून २ जागांसाठी ६ उमेदवार आहेत.

- Advertisement -

ग्रामपंचायत गटात अनुसूचित जाती जमाती गटातून १ जागेसाठी ३ उमेदवार, आर्थिक दुर्बल घटकासाठीच्या १ जागेसाठी २ उमेदवार, व्यापारी गटातून २ जागांसाठी ४ उमेदवार आणि हमाल मापारी मतदारसंघातून १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, येत्या २८ एप्रिलला बाजार समितीची निवडणूक होणार असून या निवडणुकीचा निकाल काय असेल?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे


हेही वाचा : वज्रमुठ सभेनंतर नागपुरात भाजप-संघाची बैठक, निवडणुकीसंदर्भात आमदारांना दिले महत्त्वाचे आदेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -