घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा नको; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा नको; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात भाजपासोबत युती करत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र या सरकार स्थापनेनंतर भाजपा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा वापर करत असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात भाजपासोबत युती करत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र या सरकार स्थापनेनंतर भाजपा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा वापर करत असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षांकडून केला जात आहे. नुकताच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर भाष्य केलं असून, त्याच्या युतीबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. “भाजपला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे नको होते, त्याच पध्दतीने एकनाथ शिंदेसुद्धा नको”, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. शिवाय, परिस्थिती अनुकूल दिसली तर एकनाथ शिंदेंना भाजप सोबत घेईल असेही आंबेडकर यांनी म्हटले. (prakash ambedkar talk on bjp cm eknath shinde maharashtra)

यवतमाळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर टीकास्त्र सोडली. “सध्या राज्यात जे चालले आहे, ते राजकारणाच्या दृष्टीने योग्य नाही. ही काही गादीची लढाई नाही. मतदार हा राजा आहे. त्या राजाला कोणाला बसवासे वाटते तो त्याला बसवेल. तो निर्णय आनंदाने स्विकारावा. ज्याप्रमाणे भाजपला उद्धव ठाकरे हे नको होते, तसेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नको आहेत”, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

- Advertisement -

अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणुकी संदर्भातही प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले. “या निवडणुकीसंदर्भात आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहोत. ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार असल्याने त्याला पाठिंबा देण्याचा विषय नाही. आमच्याकडे अद्याप कोणीही पाठिंबा मागितला नाही. सुप्रीम कोर्टाने जे अनियंत्रित अधिकार निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याचे काय होऊ शकत याची माहिती मी लोकांसमोर मांडली होती” असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.


हेही वाचा – परतीच्या पावसाचे राज्यभरात थैमान; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान तर, पुण्याला सर्वाधिक फटका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -