घरमहाराष्ट्रनाशिकआधी मैत्री मग, बंदुकीचा धाक

आधी मैत्री मग, बंदुकीचा धाक

Subscribe

सहा मुलांना घरातील दागिने, रोकड आणण्यास पाडले भाग, तरुण फरार

नाशिक :  मुलांशी मैत्री करून तरुणाने बंदुकीचा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागिने, रोकड आणण्याची धमकी देत 5 लाख रुपयांचे दागिने खंडणीपोटी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने चार महिन्यापूर्वी गंगापूर रोडवरील चार मुले आणि अंबड येथील दोन मुलांकडूनी अशाच प्रकारे खंडणी उकळवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तो फरार झाला आहे.

 याप्रकरणी सारंग पटेल (रा. माणिकनगर, गंगापूर रोड) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित आरोपी अथर्व देशमुख (वय 22, रा. आनंदवली, गंगापूर रोड, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंग पटेल यांचा मुलगा ओजस पटेल हा गंगापूर रोडवरील एका खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी जातो. संशयिताने त्याच्या परिसरात राहणार्‍या ओळखीच्या मुलाच्या मदतीने ओजससोबत ओळख वाढवली. त्यानंतर ओजसला फिरण्यास नेत बंदुकीचा धाक दाखवत तुझ्या घरातून दागिने अथवा रोकड घेऊन ये नाही, तर तुला ठार मारीन, अशी धमकी त्याने दिली.

 भीतीपोटी ओजास याने 5 लाखांचे दागिने दिले. त्यानंतर घरात दागिने नसल्याने पटेल समजले. सर्वत्र शोध घेतला मात्र, दागिने मिळून येत नव्हते. त्यांनी त्यांच्या मित्राला हा प्रकार सांगीतला तेव्हा मित्राच्या मुलाकडून अशाच प्रकारे धमकी देत सोन्याची चेन घेतल्याचे समोर आले. पटेल यांनी मुलास याबाबत विचारले असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. मुलाला ठार मारण्याची धमकी देत खंडणी मागितली जात असल्याची तक्रार पोलिसांत दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -