घरमहाराष्ट्र...तर भाजपचा सपाया होईल - प्रकाश शेंडगे

…तर भाजपचा सपाया होईल – प्रकाश शेंडगे

Subscribe

जर सर्व ओबीसी नेते भाजपमधून बाहेर पडले तर भाजपचा सपाया झाल्याशिवाय राहणार नाही', अशी टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

‘भाजपमध्ये ओबीसी नेत्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न होत असून, जर सर्व ओबीसी नेते भाजपमधून बाहेर पडले तर भाजपचा सपाया झाल्याशिवाय राहणार नाही’, अशी टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. एवढेच नाही तर ‘भाजपने सर्वाधिक त्रास गोपीनाथ मुंडेंना दिला. त्यांना दोनदा काढण्याचा प्रयत्न केला. पण, आम्ही त्यांच्या पाठिशी ठाम राहिल्याचे शेंडगे यावेळी म्हणालेत. भाजपमधील सर्व बहुजन समाजातील नेत्यांवर अन्याय झाला आहे. मुंडे साहेबांपासून गणेश हाकेपर्यंत अन्याय केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. एवढच नाही तर ओबीसी नेत्यांवर अन्याय आणि आदिवासी नेत्यांचा आवाज दाबण्याच काम देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोप भाजप आमदार करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तर एकनाथ खडसे यांच्यावर देखील अन्याय झाला आहे. खडसे ३० ते ४० वर्षांपासून या पक्षांमध्ये काम करत आहेत. त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. त्यांचे तिकीट कट केले एवढच नाही तर त्यांच्या मुलीला पाडण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही भाजपमधील सर्व ओबीसी नेत्यांना आवाहन करतो की भाजप विरोधात एकत्र या’, असे शेंडगे यांनी सांगितले. एवढेच नाही तर भाजपचा हा कार्यक्रम जास्त दिवस चालणार नाही जर सर्व ओबीसी नेते बाहेर पडले तर भाजपमध्ये दोन – चार आमदार राहतील, असे देखील ते यावेळी म्हणालेत.

राज्यात नवा पर्याय निर्माण करू

‘आज राज्यात ६० टक्के ओबीसी वोट बँक आहे. त्यामुळे राज्यात एक नवीन पर्याय आम्ही निर्माण करू’, असे देखील ते यावेळी म्हणालेत. नाथाभाऊ काल भाजपच्या पक्ष श्रेष्ठीना भेटायला गेले होते. पण, त्यांना पक्षश्रेष्ठी भेटले नाहीत त्यामुळे ते शरद पवार यांना भेटले ओबीसी नेत्यांना न्याय देण्याची भूमिका आजवर पवार साहेबांनी घेतली आहे, त्यामुळे खडसे भेटल्याचे ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Citizenship Amendment Bill: राज्यसभेत आमच्या प्रश्नांची उत्तरे घेऊ – उद्धव ठाकरे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -