घरमहाराष्ट्रपुण्यात तरुणावर प्राणघातक हल्ला; तरुण गंभीर जखमी

पुण्यात तरुणावर प्राणघातक हल्ला; तरुण गंभीर जखमी

Subscribe

धारदार शास्त्रांनी अज्ञात तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपरी - चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाण्याच्या टाकीजवळ थांबलेल्या तरुणावर अज्ञातांनी खुनी हल्ला चढवल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास पिंपरी – चिंचवड येथील विकासनगर येथे घडली आहे. विकासनगर येथे राहणारे राहुल चंद्रमनी ओव्हाळ (२६) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रमनी ओव्हाळ (४५) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; जखमी राहुल रविवारी रात्री दहाच्या सुमारास विकासनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ थांबला होता. त्यावेळी, अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये राहुल गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून देहूरोड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सोनं आणि पैसे नाही तर आता कांदा लसनाची झाली चोरी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -