घरमहाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीचा आदेश मागे घ्या; प्रवीण दरेकरांची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीचा आदेश मागे घ्या; प्रवीण दरेकरांची मागणी

Subscribe

एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर

आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर नोकरीतून काढून टाकण्याचा बडगा दाखविला जात आहे. त्यामुळे एसटी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्काळ मागण्या कराव्यात आणि संपकारी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे अन्यायकारक परिपत्रक मागे घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी दिला. बडतर्फीचे परिपत्रक मागे घेतले नाही तर भाजप राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.

दरेकर यांनी आज एसटीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली आणि एसटी कर्मचऱ्यांच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले. या भेटीनंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना दरेकर म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आज अंधारात आहे. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सुमारे ३० च्या वर एसटी कर्मचाऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत. पण परिवहनमंत्री किंवा कोणी वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कुटुंबियांचे दु:ख कोणी बघायला गेले का? त्यांच्या कुटुंबियाना कोणी आधार दिला का? असे सवाल त्यांनी केले.

- Advertisement -

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. एसटी कर्मचारी अक्षरश: पिचला गेला आहे. आज सकाळी कळंब येथे सच्चिदानंद नावाचा कर्मचारी झाडाला फास लावून आत्महत्या करायला जात होता. सुदैवाने पोलिसांनी त्याला खाली उतरवले. परंतु गेंडयाच्या कातडीच्या सरकारला संवेदना राहिलेल्या नाहीत. आज दिवाळी तोंडावर आली आहे तरीही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.

व्यवस्थाकीय संचालकांशी भेट घेऊन त्यांच्याकडे दरेकर यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळ तत्काळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या भावना त्यांनी परिवहन खात्याला आणि राज्य सरकारला कळवाव्यात. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीन करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -