घरCORONA UPDATECorona: केंद्राने दिलेली १ लाख ७० हजार कोटींची मदत तुटपुंजी - पृथ्वीराज...

Corona: केंद्राने दिलेली १ लाख ७० हजार कोटींची मदत तुटपुंजी – पृथ्वीराज चव्हाण

Subscribe

जगासह देशाला कोरोनाने ग्रासले असून त्यामुळे लॉकडाऊनची स्थिती उद्भवली आहे. त्याचा थेट परिणाम हा देशातील अर्थव्यवस्थेवर होत आहे. सध्या सर्वच उद्योगधंदे, व्यवसाय, कंपन्या बंद असून त्यामुळे उप्तन्नाचा आकडा घसरला आहे. बॅंकांनीही तीन महिन्यांसाठी कर्जावरील व्याजाला स्थगिती दिली आहे. मात्र हा व्याजाचा भार केंद्र सरकार उचलणार की राज्यावर येणार हा प्रश्न निर्माण होत आहे. यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशासह राज्यावरील आर्थिक संकट किती गंभीर आहे याचे विश्लेषण केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मुद्दे मांडले. तसेच कोरोनाच्या संकटकाळी केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिलेली १ लाख ७० हजार कोटींची मदत ही अतिशय तुटपुंजी असल्याचेही मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण

देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटसमयी ढासळत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेलाही उभारी देणे तितकेच गरजेचे आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेले १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज तुटपुंज असून काही लाख कोटींचे पॅकेज केंद्राने द्यायला हवे. त्यासाठी वित्तीय तूट आणि जीडीपीच्या तुलनेत १०० टक्के कर्ज हा उपाय अवलंबता येईल, असे चव्हाण यांनी सुचवले आहे. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ७० टक्के इतके कर्ज आपला देश काढतो. अमेरिका १०० टक्के तर जपान १६० टक्के काढतो. भारतानेही सध्याच्या परिस्थितीत देशाच्या जीडीपीच्या १०० टक्के इतके कर्ज काढायला हवे, असेही चव्हाण म्हणाले. त्यामुळे देशातील आर्थिक स्थितीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली असून केंद्रीय अर्थमंत्रालयाने कोणते उपाय करावेत याबाबतही काही सुचना त्यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा-

‘लॉकडाऊनचे निर्बंध हटवल्यास, घातक परिणाम भोगावे लागतील’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -