घरमहाराष्ट्रराज्यातील आणखी नऊ आयपीएस अधिकाऱ्यांची गृह विभागाकडून पदोन्नती

राज्यातील आणखी नऊ आयपीएस अधिकाऱ्यांची गृह विभागाकडून पदोन्नती

Subscribe

राज्य पोलीस दलातील अन्य नऊ आयपीएस अधिकार्‍यांच्या बढत्या देऊन म्हणजेच पदोन्नती करून त्यांची बदली करण्यात आली आहे. सोमवारी राज्यातील 29 आयपीएस अधिकार्‍यांच्या पदोन्नती करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर आज मंगळवारी (ता. 25 एप्रिल) सलग दुसर्‍या दिवशीही अन्य अधिकार्‍यांना बढत्या देण्यात आल्या आहेत.

राज्य पोलीस दलातील अन्य नऊ आयपीएस अधिकार्‍यांच्या बढत्या देऊन म्हणजेच पदोन्नती करून त्यांची बदली करण्यात आली आहे. सोमवारी राज्यातील 29 आयपीएस अधिकार्‍यांच्या पदोन्नती करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर आज मंगळवारी (ता. 25 एप्रिल) सलग दुसर्‍या दिवशीही अन्य अधिकार्‍यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. पदोन्नती केल्यानंतर या अधिकाऱ्यांची बदली देखील करण्यात आलेली आहे.

पुणे गुन्हे शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेशकुमार मेकला यांची महाराष्ट्र राज्याच्या वैधमापन शास्त्र विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक पदी पदोन्नती करण्यात आली आहे. तर प्रशिक्षण व खास पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून राजकुमार व्हटकर यांना बढती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेशकुमार यांची अनुक्रमे त्याच ठिकाणी अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बदली दाखविण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच, व्हीआयपी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महाानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची फोर्स व्हनच्या अप्पर पोलीस महासंचालक पदी, तर गृहविभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना यांची कायदा व सुव्यवस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक पदी पदोन्नती करण्यात आलेली आहे. प्रशासन विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अनुपकुमार सिंह यांची प्रधान सचिव (विशेष) पदी, गृहमंत्रालयात, बदलीच्या प्रतिक्षेत असलेले निखील गुप्ता यांची प्रशासन विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक पदी, रविंद्र सिंघल यांची महामार्ग सुरक्षा विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक तर फोर्स व्हनचे अप्पर पोलीस महासंचालक यांची महाराष्ट्र राज्य, आर्थिक गुन्हे शाखेत बढती देऊन बदली दाखविण्यात आलेली आहे. याबाबतचे शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून जारी करण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, सोमवारी (ता. 24 एप्रिल) मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या आरोपांमुळे चर्चेत असणारे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या बदलीचे विशेष आदेश काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. याशिवाय, दहशतवाद विरोधी पथकाचे अपर महासंचालक सदानंद दाते आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अपर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे.

सोमवारी करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन यांचाही समावेश आहे. मल्लिकार्जुन यांची मुंबई विशेष पोलीस पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता बृहन्मुंबई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डी.एस. चव्हाण यांच पदोन्नती होऊन बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा – विरारच्या ३० हजार नागरिकांना हायकोर्टाचा दिलासा; झोपडपट्टी तोडण्यास स्थगिती

संभाजीनगरचे नवीन पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि नव्याने छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदलून आलेले डी.एस. चव्हाण या दोघांनी शहर पोलिसात यापूर्वी एसीपी म्हणून काम पाहिलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -