घरमहाराष्ट्रमुळा- मुठा नदीवर पूल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर; पण विरोधकांचा आरोप

मुळा- मुठा नदीवर पूल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर; पण विरोधकांचा आरोप

Subscribe

बांधकाम व्यावसायिकाचे हित जपण्यासाठी हा प्रस्ताव ठेवला असून तो पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

बांधकाम व्यावसायिकाचे हीत जपण्यासाठी सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर केशवनगर मुंढवा येथे मुळा- मुठा नदीवर पूल बांधण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. या भागाचा महापालिका हद्दीत समावेश होण्यापूर्वी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने हा पूल स्वखर्चाने बांधण्याचा प्रस्ताव पीएमआरडीएला सादर केला होता. पण बांधकाम व्यावसायिकाचे हित जपण्यासाठी हा प्रस्ताव ठेवला असून तो पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय – विरोधी पक्ष

विशेष म्हणजे महापालिकेने समाविष्ट गावांचा केलेल्या विकास आराखड्यात नियोजित पुलाच्या पुढे ४०० मीटर अंतरावर पुलाकरिता आरक्षण ठेवले होते. खराडी ते केशवनगर मुंढवा या दोन भागांना जोडण्यासाठी विकास आराखड्यात पूल निश्चित केला होता. या भागाच्या जवळच एका बांधकाम व्यावसायिकाचा प्रकल्प साकारला जात आहे. या बांधकाम व्यावसायिकाने पीएमआरडीएकडे विकास आराखड्यातील नियोजित पुलाच्या अलिकडे पूल बांधून देण्याची तयारी दाखवली होती. परंतु हा भाग महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने घुमजाव केले. सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने संगनमत करीत विकास आराखड्यातील नियोजित पुलाची जागा बदलून पूल बांधण्याचा प्रस्ताव मंजुर केला. या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने विरोध केला. बांधकाम व्यावसायिकाचे हित जपण्यासाठी हा प्रस्ताव ठेवला असून तो पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -