घरमहाराष्ट्रलॉकडाऊनच्याविरोधात वंचितकडून डफली बजाव!

लॉकडाऊनच्याविरोधात वंचितकडून डफली बजाव!

Subscribe

सरकार लॉकडाऊन उठवायला आणि सवलती द्यायला तयार नसल्याच्या निषेधार्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात डफली बजाव आंदोलन

केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत. याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी राज्यभर डफली बजाव आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनला विरोध केला होता. त्यामुळे आज राज्यभर डफली बजाव आंदोलन करण्याची हाक देण्यात आली होती. राज्यातील एसटी सेवा आणि महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आले. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. तर दुसरीकडे, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो आणि शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफली वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. राज्यातील अनेक शहरांमध्ये वंचितकडून डफली बजाव आंदोलन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -