घरअर्थजगतराज्यात आज सार्वजनिक सुट्टी, कोर्ट बंद; पण शेअर मार्केट सुरू राहणार

राज्यात आज सार्वजनिक सुट्टी, कोर्ट बंद; पण शेअर मार्केट सुरू राहणार

Subscribe

महाराष्ट्र, दक्षिण आणि उत्तर गोवा, दादरा, नगर हवेली आणि दीव, दमण आणि सिल्वासा येथील दुय्यम न्यायालये सोमवारी बंद राहणार आहेत. राज्यभरातील शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आज बंद ठेवण्यात येणार आहेत. पण केंद्राच्या अखत्यारीतील बँका सुरू राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मुंबईः ठाकरे सरकारने गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवार 7 फेब्रुवारीला एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीय. विशेष म्हणजे सर्व बंद असले तरी शेअर बाजार आज खुला राहणार आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल मुंबई उच्च न्यायालयही आपल्या सर्व खंडपीठांवरील सर्व न्यायालयीन कामकाज 7 फेब्रुवारीला म्हणजेच आज स्थगित करणार आहे.

महाराष्ट्र, दक्षिण आणि उत्तर गोवा, दादरा, नगर हवेली आणि दीव, दमण आणि सिल्वासा येथील दुय्यम न्यायालये सोमवारी बंद राहणार आहेत. राज्यभरातील शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आज बंद ठेवण्यात येणार आहेत. पण केंद्राच्या अखत्यारीतील बँका सुरू राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

एसबीआय, बँक ऑफ इंडिया यांसारख्या सरकारी आणि खासगी बँकांवर आरबीआयचं नियंत्रण आहे. त्यामुळे राज्याचे निर्णय केंद्र स्तरावर लागू होत नाही. महाराष्ट्रवगळता देशभरातील बँका आज सुरूच राहणार आहेत. फक्त महाराष्ट्रातील बँका, वित्तीय संस्था बंद राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. लतादीदींच्या निधनामुळे केंद्राच्या गृह विभागाने दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय. तर राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवण्यात आलाय. महाराष्ट्र सरकारने लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवार 7 फेब्रुवारीला एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीय.


आज रविवार 6 फेब्रुवारी 2022 ला भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून, त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झालीय. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी अधिनियम 1881 च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार 7 फेब्रुवारीला राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचाः Mhada Exams: म्हाडाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच, म्हाडाकडून परीक्षार्थींना दिलासा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -