घरमहाराष्ट्रपुणेकसबा पोटनिवडणुकीत मोठा ट्वीस्ट; कॉंग्रेसचा उमेदवार टिळकांच्या भेटीला

कसबा पोटनिवडणुकीत मोठा ट्वीस्ट; कॉंग्रेसचा उमेदवार टिळकांच्या भेटीला

Subscribe

महाविकास आघाडीचा उमेदवार रवींद्र धंगेकर आपली उमेदवारी निश्चित झाल्यावर धंगेकरांनी सर्वप्रथम केसरीवाड्यात टिळक कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे एकीकडे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. काँग्रेसने कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सस्पेन्स संपला असं वाटत असतानाच या विधानसभा मतदार संघात एक मोठा ट्वीस्ट आला. महाविकास आघाडीचा उमेदवार रवींद्र धंगेकर आपली उमेदवारी निश्चित झाल्यावर धंगेकरांनी सर्वप्रथम केसरीवाड्यात टिळक कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदार संघाची जागा रिक्त झाली तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी न दिल्यानं शैलेश टिळक यांची नाराज उघड उघड दिसून आली. अशात कॉंग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते टिळक कुटुंबियांच्या भेटीला गेले. यावेळी त्यांनी मुक्ता टिळकांना अभिवादन केले.

- Advertisement -

“कसबा मतदार संघात काम करताना दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्याशी २० वर्षांपासूनचा माझा संपर्क होतो. अनेक सामाजिक कामाबाबत त्यांच्याशी चर्चा होत असे. त्यामुळे आज टिळक कुटुंबियांची भेट आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यास सांगितले आहे,” अशी प्रतिक्रिया यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केली. तसंच यानंतर त्यांनी मुक्ताताईंचं स्वप्नं भाजप नाही तर काँग्रेस पूर्ण करणार आहे असं विधान करत रविंद्र धंगेकर यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.

- Advertisement -

कसबा पोटनिवडणुकीमध्ये धंगेकर विरुद्ध भाजप युतीचे उमेदवार हेमंत रासने अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. धंगेकर हे रविवार पेठ, कसबा पेठ परिसरातून सातत्याने 5 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळेच दोन वेळा शिवसेना, दोन वेळा मनसे आणि एकवेळ काँग्रेसचे सहयोगी नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे कडून कसबा विधानसभा लढताना त्यांनी भाजपचे तगडे नेते गिरीष बापट यांना नाकीनऊ आणले होते. अवघ्या 7 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. २०१४ च्या निवडणुकीत ही त्यांना लक्षणीय मते मिळाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -