घरमहाराष्ट्रअशी ठरणार खऱ्या पुणेकराची ओळख!

अशी ठरणार खऱ्या पुणेकराची ओळख!

Subscribe

वाहतूकीच्या विविध समस्यांवर मार्ग काढण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तब्बल १० ते ११ जनजागृतीपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून खरा पुणेकर काेण हे सांगितले आहे.

पुणे तिथे काय उणे… असे म्हणतात ते काही खोटे नाही. आजवर खऱ्या पुणेकराची ओळख सांगणारे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. मात्र आता पुण्यातील वाहतूक पोलीस खरा पुणेकर कोण आणि तो कसा असतो, हे सांगणार आहेत. हे सांगणार आहेत. वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यासाठी काही व्हिडीओ तयार केले असून या व्हिडीओच्या माध्यमातून खरा पुणेकर कोण हे सांगितले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याच्या लोकसंखेत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असल्याने वाहतूक कोंडीची समस्या पुणेकरांना सतावत आहे. असे असताना वाहतूक नियम तोडणाऱ्यांमुळे अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

तब्बल ११ व्हिडीओ बनवले 

वाहतूकीच्या विविध समस्यांवर मार्ग काढण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तब्बल १० ते ११ जनजागृतीपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. येत्या काळात विविध सोशल माध्यमांमधून हे व्हिडीओ नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. या माध्यमातून वाहतूकीचे सर्व नियम पाळणारा हाच खरा पुणेकर असल्याचा संदेश देण्यात आला आहे. या व्हिडीओमधून विविध संदेश देण्यात आले आहेत. पुण्याच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत.

- Advertisement -

अपघातांचे प्रमाण झाले कमी 

वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१८ मध्ये शहर परिसरात २७ प्राणांतिक अपघात झाले होते. त्यामुळे वाहतूक पोलीस सातत्याने अपघातांची संख्या कमी करण्याकडे लक्ष देत आहेत. त्यासाठी विविध स्तरातून जनजागृतीसोबतच मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत. परिणामी जानेवारी २०१९ ला अपघातांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. या महिन्यात प्राणांतिक अपघातांची संख्या १५ वर आली आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच एक जानेवारीपासून वाहतूक शाखेकडून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. याला अनेक स्तरातून टीका होत असली तरी या कारवाईचा सकारात्मक परिणाम नागरिकांवर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक हेल्मेट वापरण्यास प्राधान्य देत आहेत.

हेही वाचा –

पुणेकरांनी चक्क हेल्मेटसक्तीचं दहावं घातलं!

- Advertisement -

फेटे घालून पुणेकरांनी काढली हेल्मेटसक्तीविरोधात रॅली

पुण्याचे सिंघम पोलीस आणि वाहतूक कोंडीवर जालीम उपाय!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -