घरमहाराष्ट्रपुणे विद्यापीठाचा प्रथम क्रमांक

पुणे विद्यापीठाचा प्रथम क्रमांक

Subscribe

ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट अशी ख्याती असणार्‍या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने द टाईम्स हायर एज्युकेशन क्रमवारीत पारंपरिक विद्यापिठांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. इतर विद्यापिठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. विद्यापिठामध्ये करण्यात येणारं संशोधन, अभ्यासक्रम, सोयीसुविधा यांच्या आधारे हे मानांकण देण्यात आले आहे. विद्यापिठाच्या या यशाबद्दल विद्यापिठातील विद्यार्थ्यांना काय वाटते ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

इंग्रजीमध्ये एम. फिल करणारा अमोल सरवदे म्हणाला, विद्यापिठाचा पारंपारिक विद्यापिठांमध्ये प्रथम क्रमांक आला असला तरी विद्यापिठात विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीसुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. सध्या विद्यार्थ्यांसाठी पुरेसे वसतीगृहे विद्यापिठात नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खासकरुन विद्यार्थींनींना वसतिगृह न मिळाल्यास नातेवाईकांकडे किंवा बाहेर खोली घेऊन रहावे लागते. यात त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण होतो. संशोधनात मात्र विद्यापिठाने चांगली प्रगती केली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविल्यास विद्यापिठाच्या संयुक्त क्रमवारीत आणखी सुधारणा होऊ शकते.

- Advertisement -

पॉलिटीकल सायन्सच्या दुसर्‍या वर्षाला असणारी रुक्साना शेख म्हणाली, राज्यातील तसेच देशातील अन्य पारंपारिक विद्यापिठांच्या तुलनेत पुणे विद्यापिठाचा दर्जा खूप चांगला आहे. शिक्षणाच्या बाबतीत विद्यापीठ चांगली कामगिरी करत आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनाने इतर गोष्टींवर सुद्धा लक्ष द्यायला हवे. विद्यापिठातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये अनेक असुविधा आहेत. याबाबत आम्ही अनेकवेळा विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु विद्यापिठाकडून फारसे लक्ष देण्यात आले नाही. त्याचबरोबर विद्यापिठातील विद्यार्थींनींना सॅनिटरी नॅपकीन टाकण्यासाठीची कुठलिही सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थीनींना अडचणींचा सामाना करावा लागतो. प्रवेश प्रक्रीयेमध्ये पारदर्शकता येणे आवश्यक आहे. वसतिगृहांची संख्या सुद्धा वाढवायला हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -