घरमहाराष्ट्रपुणेपुणे-मुंबई महामार्गावर ट्रक सुस्साट निघाला अन् अचानक ब्रेक फेल, पुढे काय घडले?

पुणे-मुंबई महामार्गावर ट्रक सुस्साट निघाला अन् अचानक ब्रेक फेल, पुढे काय घडले?

Subscribe

मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर विनाचालक ट्रकचा थरारक प्रवासाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणे आता जिकरीचे होऊ लागल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून केली जातेय. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी पुण्यातील नवले पुलावर घडला होता. अवजड वाहनाने असंख्य वाहनांना धडक दिली होती. 

पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी थरार पाहायला मिळाला. ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने चालकाने ट्रकबाहेर उडी घेतली. मात्र, हा ट्रक विनाचालक वेगाने धावतच सुटला. सुदैवाने या ट्रकने इतर वाहनांना धडक दिली नाही. परंतु, डिवायडरला धडक देत ट्रक पुढे गेल्याने महामार्गावर थरारसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सिमेंटरच्या गोळ्या घेऊन एक ट्रक मुंबईच्या दिशेने रवाना होत होता. मात्र, ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने अमृतांजन पुलाजवळ गाडीबाहेर उडी घेतली. हा विनाचालक ट्रक रस्त्यावर धावत सुटला. मृतांजन पुलापासून सुमारे 500 मीटर अंतरावर ट्रकने खडकाला धडक दिल्याने ट्रक थांबला आणि मोठा अपघात टळला. शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

- Advertisement -

दरम्यान, मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर विनाचालक ट्रकचा थरारक प्रवासाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणे आता जिकरीचे होऊ लागल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून केली जातेय. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी पुण्यातील नवले पुलावर घडला होता. अवजड वाहनाने असंख्य वाहनांना धडक दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -