घरगणेशोत्सव 2023पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत माणुसकीचं दर्शन; अलोट गर्दीतून Ambulance ला मिळाली वाट

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत माणुसकीचं दर्शन; अलोट गर्दीतून Ambulance ला मिळाली वाट

Subscribe

पुणे : गणपती बाप्पाची 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज निरोप देण्यात येणार आहे. मुंबई आणि पुण्यात गणपती विसर्जनचा उत्साह पाहाण्यासाठी हजारोच्या संख्येने गणेशभक्त गर्दी करतात दिसतात. अशीच गर्दी पुण्यातील बेलबाग चौकामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत जमली होती. ढोल-ताशांच्या ठेक्यावर तरुणाई थिरकत होती. अशातच Ambulance आली आणि तिला अलोट गर्दीतून वाट करून देण्याचं आवाहन पुणे पोलिसांकडे उभं राहिलं. पण Ambulance चा आवाज ऐकताच ढोल-ताशा पथकाने वादन थांबवलं. कार्यकर्ते, स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला धावून आले आणि हजारोंची गर्दी अवघ्या काही सेंकदात दोन भागात विभागली गेली. Ambulance कोणत्याही अडथळ्याविना निघून गेली. यानंतर पुन्हा त्याच जल्लोषात गणपती मिरवणुकीला सुरूवात झाली. (A glimpse of humanity in Pune’s immersion procession; Ambulance found its way through the crowd)

हेही वाचा – मुंबईतील गपणती विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त; लालबाग-परळमध्ये अशी आहे व्यवस्था

- Advertisement -

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीची वेगळाच उत्साह असतो. या काळात काही अनुचित घटना घडू नये, यासाठी गोपनिय यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. चेनस्नैचिंग, महिला छेडछाड रोखण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत. लहान मुले, वयोवृद्धांच्या सहाय्यतेसाठी मदत केंद्र उभारण्यात आलेली आहेत. इमर्जंसी परिस्थीतीमध्ये Ambulance साठी स्वतंत्र मार्ग नियोजीत करण्यात आलेले आहेत. पण असे असतानाही एक Ambulance इमर्जंसी परिस्थितीमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीच्या ठिकाणी आली आणि हजारोंच्या संख्येने तिला वाट करून दिल्यामुळे या गोष्टींची पुणेकरांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गडबड, गोंधळ, ढकलाढकली, चेंगराचेंगरी न होता भाविकांनी Ambulance ला वाट करून दिल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एका इमारतीच्या छतावरून गणपती मिरवणुकीचे शूटिंग करताना ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

हेही वाचा – कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत हाणामारी; तीन जण जखमी

- Advertisement -

पुण्यात आज 2000 गणपती मंडळांचं विसर्जन

10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज निरोपाची वेळ आली आहे. खासकरून पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक दिमाखात काढण्यात येते. ही मिरवणूक पाहण्यााठी हजारोंच्या संख्येने पुणेकर रस्त्यावर उतरतात. मिरवणूक व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी पुणे पोलिसांवर असते. आजच्या दिवशी ट्रॅफिक जॅमची लोकांना त्रास होऊ नये यासाठी काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. शहरात बीडीडीएस पथके, आरसीपी आणि क्युआरी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. आजच्या दिवशी जवळपास 2000 सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार असल्यामुळे सुमारे 9000 पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पुणे पोलीस मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवून आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -