घरICC WC 2023IND vs BAN Weather: 'तेज' चक्रीवादळामुळे भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे ढग?

IND vs BAN Weather: ‘तेज’ चक्रीवादळामुळे भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे ढग?

Subscribe

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 17 व्या सामन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने येणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. हा सामना गुरुवारी, आज दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे.

पुणे: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 17 व्या सामन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने येणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. हा सामना गुरुवारी, आज दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. मात्र पुण्यात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी पुण्यात पाऊस पडला होता. तसंच, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे याला ‘तेज’ असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे पुण्यातील हवामान बदलले आहे. (India vs Bangladesh Weather report Rain clouds over India Bangladesh match due to Tej cyclone )

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने 2023 च्या विश्वचषक सामन्यांमध्ये तीन शानदार विजय नोंदवले आहेत. भारत सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या सामन्यात भारतानने पाचवेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला तर तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानचा सात गडी राखून भारतानं पराभव केला.

- Advertisement -

दरम्यान, शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशने अफगाणिस्तानचा सहा विकेट्सने पराभव करून विश्वचषक 2023 च्या मोहिमेला सुरुवात केली. मात्र, 364 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरल्यानंतर बांगलादेश संघाचा दुसरा सामना गतविजेत्या इंग्लंडसोबत झाला ज्यात त्यांना अपयश आलं. तिसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करूनही बांगलादेशला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात 40 वेळा सामना झाला आहे. यापैकी भारताने 31, बांगलादेशने फक्त 8 सामने जिंकले आहेत आणि एक सामना अनिर्णीत राहिला आहे. मात्र, बांगलादेशने भारताविरुद्धच्या पाचपैकी तीन एकदिवसीय सामने जिंकले आहेत. आशिया चषक 2023 च्या सुपर फोर टप्प्यात दोन्ही संघांमध्ये शेवटचा सामना झाला, ज्यामध्ये बांगलादेशने सहा धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने 2022 च्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा 2-1 ने पराभव केला आहे.

- Advertisement -

पुण्याच्या खेळपट्टीची स्थिती कशी आहे?

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. येथे संपूर्ण सामन्यात धावा करणे खूप सोपे आहे. मैदानही खूपच लहान आहे, त्यामुळे फिरकी गोलंदाजांविरुद्ध खूप धावा करता येतात. येथे भारताने 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या (356/2) केली होती. सर्वात कमी धावसंख्याही भारताने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (232 धावा) केली होती.

हवामान कसे असेल?

हवामान माहिती वेबसाइट Weather.com नुसार, भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. पावसाची शक्यता एक ते चार टक्के असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील. मात्र तेज चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येथे पाऊस होऊ शकतो. बुधवारी सायंकाळीही येथे पाऊस झाला. वादळाचा प्रभाव दिसल्यास संपूर्ण सामन्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसंच, येथे जोरदार वारेही वाहू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -