घरमहाराष्ट्रपुणेत्यांची काही अडचण असेल, प्रश्न असतील; अदानी शरद पवार भेटीवर अजित पवारांची...

त्यांची काही अडचण असेल, प्रश्न असतील; अदानी शरद पवार भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी (1 मे) भेट झाल्यानंतर काही तासांनी उद्योगपती गौतम अदानी यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली आहे. गौतम अदानी यांची शरद पवार आणि भाजपाशी जवळीकीचे नाते आहे. याआधीही अदानी यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे ही भेटही अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. या भेटीसंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, त्यांची काही अडचण असेल, प्रश्न असतील म्हणून भेट घेतली असेल. अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना वक्तव्य केले. (Ajit Pawar’s reaction on Sharad Pawar’s Gautam Adani meet)

अजित पवार म्हणाले की, उद्या आम्ही कोणाला भेटल्यावर कशा करता भेटलो, किती वाजता भेटलो, किती वाजता बाहेर पडलो आणि कोणता मुद्यावर चर्चा झाली यासंदर्भात तुम्ही प्रश्न विचारता. मी मागे उपमुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमचे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण असताना आम्हाला काही महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा करण्याकरता पंतप्रधानांना भेटलो होतो. पंतप्रधानांनी वेळ दिली होती. त्याचप्रमाणे अदानी अनेकदा शरद पवारांना भेटत असतात. त्यांची ओळख आहे. त्यांची काही अडचण असेल, प्रश्न असतील, काही गोष्टी मांडायच्या असतील किंवा मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाची जी कमिटी होती त्यांनी दिलेल्या निकालाबद्दल मला माहिती नाही त्याच्याबद्दल, परंतु वेगवेगळे उद्योगपती वेगवेगळी गुंतवणूक वेगवेगळ्या राज्यामध्ये करत असतात. गौतम अदानी देखील हिंडनबर्गचा प्रश्न निघाला असला तरी देखील त्यांचे अनेक राज्यामध्ये गुंतवणूक चालू आहे. आपल्या राज्यामध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रकल्प सुरू आहे. ते कोणत्या कारणांकरता भेटले हे मला माहिती नाही कारण मी काल संध्याकाळी मुंबईहून पुण्याला गेलो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

- Advertisement -

गौतम अदानी यांनी शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’वर भेट घेतली
अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. हिंडनबर्ग रिपोर्टनंतर विरोधक अदानी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधकांनी जेपीसीची मागणी केली आहे. पण, या मागणीला पवारांनी गरज नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. काही दिवसांपूर्वी गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर अनेक चर्चाही सुरू झाल्या होत्या.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतल्यानंतर गौतम अदानी अचानक सिल्व्हर ओकवर भेट घेतली. या भेटीमागचं नेमकं खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यामुळे या भेटीमागे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -