घरमहाराष्ट्रदर्जेदार 89 मराठी चित्रपटांना मिळणार आर्थिक अनुदान; शुक्रवारी धनादेशाचे वितरण

दर्जेदार 89 मराठी चित्रपटांना मिळणार आर्थिक अनुदान; शुक्रवारी धनादेशाचे वितरण

Subscribe

फेब्रुवारी ते जून 2023 या कालावधीत एकूण 174 चित्रपट परीक्षण करण्यात आले आहेत. त्यापैकी ‘अ’ दर्जा प्राप्त चित्रपट 37, ‘ब’ दर्जा प्राप्त चित्रपट 48, राज्य-राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपट 4 असे एकूण 89 चित्रपटांना अनुदान वितरण करण्यात येणार आहे.

मुंबई : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य अनुदान योजनेतर्गत तब्बल 89 मराठी चित्रपटांना धनादेश वितरण करण्यात येणार आहे. शुक्रवारी (20 ऑक्टोबर) सायंकाळी 6 वाजता, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेश वितरण कार्यक्रम होणार आहे. (Quality 89 Marathi films will get financial subsidy Delivery of check on Friday)

फेब्रुवारी ते जून 2023 या कालावधीत एकूण 174 चित्रपट परीक्षण करण्यात आले आहेत. त्यापैकी ‘अ’ दर्जा प्राप्त चित्रपट 37, ‘ब’ दर्जा प्राप्त चित्रपट 48, राज्य-राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपट 4 असे एकूण 89 चित्रपटांना अनुदान वितरण करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 29 कोटी 85 लाख रुपयांचा निधी वितरीत होणार आहे. राज्य शासनाने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना कार्यान्वित केली आहे. त्यात कालानुरूप बदल करून सुधारणा करण्यात आल्या असून या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने करण्यात येते.

- Advertisement -

हेही वाचा : IND VS BAN : विराटच्या शतकामुळे भारताचा सलग चौथा विजय, बांगलादेशचा सात गडी राखून पराभव

असे मिळते अनुदान

दर्जेदार चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेनुसार “अ” दर्जा प्राप्त चित्रपटांकरिता 40 लाख रुपये इतके अनुदान आणि “ब” प्राप्त चित्रपटांकरता 30 रुपये लाख इतके अनुदान मंजूर करण्यात येते. परिक्षणाअंती ज्या चित्रपटांना 71 च्या पुढे गुण असतील त्यांना “अ” दर्जा, व 51 ते 70 गुण असणाऱ्या चित्रपटांना “ब” दर्जा देण्यात येतो.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत ‘तो’ प्रस्ताव न आल्याने फडणवीस संतप्त

28 सदस्यांची चित्रपट परिक्षण समिती गठीत

महाराष्ट्र राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना कोणत्याही परीक्षणाशिवाय “अ” दर्जा देण्यात येतो. मात्र यासाठी चित्रपट प्रदर्शनासंबंधीच्या अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी एकूण 28 सदस्यांची चित्रपट परिक्षण समिती गठीत करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘दशक्रिया’, ‘बार्डो’ आणि ‘फनरल’ आणि राज्य पुरस्कार प्राप्त चित्रपट ‘तेंडल्या’ यांना अनुदान मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -