घरCORONA UPDATECorona: अखेर राज्यातील 'त्या' नागरिकांना करताहेत क्वारंटाईन

Corona: अखेर राज्यातील ‘त्या’ नागरिकांना करताहेत क्वारंटाईन

Subscribe

दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांना आता क्वारंटाईन करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांना आता क्वारंटाईन करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. प्रशासन त्या नागरिकांनापर्यंत पोहचले असून प्रत्येकाचा शोध घेत आहेत. याशिवाय राज्यात घोषित लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले. सर्व धर्माच्या प्रमुख गुरू आणि धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही, तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल, असे आवाहन करणे खूप गरजेचे आहे. या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे, असे सांगितले.

हेही वाचा – Coronavirus: कोरोनासाठी विशेष रुग्णालय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisement -

पुण्यात सापडले १०६ जण 

निजामुद्दीन येथे झालेल्या तलबीगी जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या तसेच त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील १८२ जणांची यादी काल विभागीय आयुक्तांना प्राप्त झाली होती. त्यामधील १०६ जणांचा शोध लागला असून बाकीच्या लोकांचा शोध सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. डॉ. म्हैसेकर म्हणाले की, निजामुद्दीन येथे तलबीगी जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १३६, सातारा जिल्ह्यातील ५, सांगली जिल्ह्यातील ३, सोलापूर जिल्ह्यातील १७ तर कोल्हापूर जिल्ह्यातील २१ जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करताना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यतिरिक्त आणखी ७ व्यक्ती आहेत.

हेही वाचा – तबलीग मूळचे कोण आहेत?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -