घरमहाराष्ट्र२ ऑगस्टला रेल्वेचे संगणकीकृत तिकीट आरक्षण तासभर बंद

२ ऑगस्टला रेल्वेचे संगणकीकृत तिकीट आरक्षण तासभर बंद

Subscribe

रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या तिकिटांचे संगणकीकृत आरक्षण २ ऑगस्ट रोजी एका तासाकरता बंद राहणार आहे.

रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या तिकिटांचे संगणकीकृत आरक्षण येत्या २ ऑगस्टला तासभर बंद राहणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना एक तास वाट पहावी लागणार आहे. हे रेल्वेचे संगणकीकृत तिकीट आरक्षण दुपारी २.१५ ते ३.१५ या वेळेत तासभर बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

का ठेवणार तिकीट आरक्षण तासभर बंद?

रेल्वेच्या तिकीट आरक्षणाची जबाबदारी घेणारी ‘क्रिस’ ही संस्था ऑनलाईन डिझास्टर रिकव्हरी ड्रील करणार असल्याने मुंबईतील पीआरएस केंद्रे तासभर बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रेल्वेचे हे संगणकीकृत तिकीट आरक्षण दुपारच्या वेळेत तासभर बंद राहणार आहे. मुंबईतील डायरेक्ट क्लाइंट साईटचे अ‍ॅप्लीकेशन सिकंदराबाद येथे स्थानांतर करण्यासाठी गुरूवारी तासभर मुंबईतील पीआरएस केंद्रे बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगकरता एक तास वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -