घरमहाराष्ट्रRain Update : मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज...

Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

Subscribe

मुंबई शहरासह हवामान खात्याकडून पालघर ठाणा जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर कोकण पट्ट्यामध्ये रत्नागिरी, रायगड ते पालघरपर्यंत पावसाचा जोर वाढून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचे आगमन झालेले आहे. परंतु पहिल्याच पावसामध्ये राज्यातील अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. तसेच प्रशासनाच्या हलगर्जीपणावरती अनेक नागरिक रोष व्यक्त करताना दिसत आहेत. त्यातच आता मुंबईमध्ये आज (ता. 27 जून) जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेले आहे त्यामुळे पहिलाच पावसात मुंबईची मुंबई झाल्याने नागरिक आणखी पाऊस पडल्यास नेमक्या कोणत्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे या विचारांनी चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे मुंबई शहरासह हवामान खात्याकडून पालघर, ठाणे या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. (Chance of heavy rain in Mumbai; Orange Alert from Meteorological Department)

हेही वाचा – एक कॅमेरा शहरासाठी या मोहिमेसाठी ठाणेकरांना आवाहन 

- Advertisement -

मुंबईत रविवारी (ता. 25 जून) सकाळी 8.30 ते सोमवारी सकाळी 8.30 या 24 तासांच्या कालावधीत कुलाबा येथे 36.6 मिमी, तर सांताक्रूझ येथे 24.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सोमवारी (ता. 26 जून) देखील उपनगरांमध्ये पावसाची संततधार ही सुरूच होती. सांताक्रूझ येथे सायं. 5.30 पर्यंत 27 मिमी पाऊस पडला, तर कुलाबा येथे शून्य मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

काल सोमवारी दिवसभरात प्रामुख्याने कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई भागांमध्ये नियमीत पाऊस सुरू होता. तर गोरेगाव, अंधेरी या भागांमध्येही काही वेळांच्या फरकाने पावसाची रिपरीप सुरू होती. सकाळी 7 पासून सायं. 7 पर्यंतच्या 12 तासांमध्ये या भागांमध्ये 20 ते 40 मिमीदरम्यान पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी मात्र कोकण पट्ट्यामध्ये रत्नागिरी, रायगड ते पालघरपर्यंत पावसाचा जोर वाढून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उद्या (ता. 28 जून) देखील पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्टचा इशारा कायम असून उर्वरित कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. सिंधुदुर्गात हा जोर केवळ मध्यम सरींपुरताच मर्यादित राहील अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे.

- Advertisement -

राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत तर पहिल्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडवून दिली. कारण पहिल्याच पावसांत मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेले पाहायला मिळाले. त्यामुळे मुंबई महापालिकेने केलेल्या नालेसफाईंच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नाले सफाईंच्या कामाची पाहणी केली होती. परंतु तरी देखील मुंबईची ‘तुंबई’ झाल्याने मुख्यमंत्री महोदयांनी नेमक्या कोणत्या कामाची पाहणी केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -