घरताज्या घडामोडीWeather Update: कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील ४ ते ५ दिवसात...

Weather Update: कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील ४ ते ५ दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Subscribe

राज्यात सध्या कडाक्याच्या उन्हाच्या झळा लागत आहे. काही शहरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मागील मार्च महिन्यात दोनदा उष्णतेची लाट आली होती आणि आताही विदर्भात सूर्य आग ओकत आहे. उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पुढील चार ते पाच दिवसांसाठी दिलासा मिळणार आहे. कारण येत्या चार ते पाच दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

दरम्यान यापूर्वी हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी पावसासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती. त्यांनी महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवसांत गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता असल्याचे सांगितले होते. यामध्ये ५ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

- Advertisement -

 

दरम्यान राज्यात उष्णतेची लाट ही कायम आहे. काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा चढला आहे. अनेक जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस झाले आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला – ४४ अंश सेल्सिअल आणि मालेगाव, चंद्रपूर – ४३ अंश सेल्सिअल झाले आहे. विदर्भातील गडचिरोली सोडले तर अकोला, अमरावती, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.


हेही वाचा – Heat Wave In April : एप्रिलमध्येच जाणवतो कडक उन्हाळा; जाणून घ्या पुढील हवामानाची स्थिती काय?


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -