घरमहाराष्ट्रRajendra Mirgane : राजेंद्र मिरगणे यांची गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती

Rajendra Mirgane : राजेंद्र मिरगणे यांची गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती

Subscribe

मुंबई : सोलापूर बार्शीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र मिरगणे यांची गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही मिरगणे यांची कॅबिनेट दर्जा असलेल्या गृहनिर्माण विकास महामंडळाच्या सहअध्यक्षपदी निवड झाली होती. आचारसंहिता लागण्यापूर्वी ही नियुक्ती करण्यात आली आहे. (Rajendra Mirgane appointed as Advisor to Ministry of Housing)

हेही वाचा – Arvind Kejriwal Arrested : भाजपा घाबरलीय, आज ही परिस्थिती असेल तर…; आत्या-भाच्याचे सरकारवर टीकास्त्र

- Advertisement -

राजेंद्र मिरगणे यांची ही निवड तीन वर्षांसाठी असून, हे अशासकीय पद आहे. गृहप्रकल्पाचा अभ्यास करून काळानुरूप त्यात बदल करण्याची व सुचवण्याची जबाबदारी मिरगणे यांच्याकडे आहे. गरिबांना परवडणारी घरे असावीत, तांत्रिक आणि आर्थिक बाबतीत सुलभता यावी, याकडे नेहमीच मिरगणे यांचा कल असतो. गृह प्रकल्पाबाबत राजेंद्र मिरगणे यांचा दीर्घ अभ्यास लक्षात घेत ही निवड करण्यात आली आहे. म्हाडाच्या अनेक रखडलेल्या योजना गतिमान करण्याच्या उद्देशाने त्यांची ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मिरगणे यांना गृहनिर्माण विभागांतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), झोपडपट्टी पुनर्वसन स्वयंविकास व पुनर्विकास प्रकल्प व महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ यांच्या मार्फत सुरू असणाऱ्या अनेक गृहप्रकल्पांच्या निर्मिती प्रक्रियेसाठी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या गृहप्रकल्पांचा अभ्यास करून काळानुरूप बदल सुचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

- Advertisement -

हेही  वाचा – Arvind Kejriwal Arrested : भाजपा घाबरलीय, आज ही परिस्थिती असेल तर…; आत्या-भाच्याचे सरकारवर टीकास्त्र

गरिबांना परवडणारी घरे आर्थिक व तांत्रिक सांगड घालून उपलब्ध करून देण्यासाठी मिरगणे यांचा गृहनिर्माण क्षेत्रातील अनुभव व अभ्यास लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. म्हाडाच्या रखडलेल्या योजना गतिमान करण्याबाबत उपाययोजना सुचविणे, सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास व स्वयं पुनर्विकासाची प्रक्रिया सुलभ करण्याबाबत उपाययोजना सुचविणे आदी बाबींवर ते काम करणार आहेत. यापूर्वी मिरगणे यांनी भाजपा शासन व महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले सहअध्यक्ष पद भूषवलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -