घरमहाराष्ट्रभाजपचा मुख्यमंत्री निश्चित?

भाजपचा मुख्यमंत्री निश्चित?

Subscribe

रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आणि शिवसेना यांचा मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगूल वाजणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीत युतीचा विजय झाला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजप की शिवसेना पक्षाचा होईल? अशा प्रश्नावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. याशिवाय मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी करार झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे कदाचित युती सरकार पुन्हा सत्तेत आले तर शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेला मुख्यमंत्री पदापासून पुन्हा लांब राहावे लागण्याची शक्यता आहे.

नेमके काय म्हणाले रावसाहेब दानवे?

रावसाहेब दानवे रविवारी भाजपच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमासाठी औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी भाजपचा मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न विचारला असता भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही असे कोण म्हणते? असा प्रतिप्रश्न विचारला. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा शिवसेनेला मुख्यमंत्री पदावरुन धोका देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, यावेळी बोलताना दानवे यांनी विधानसभेत युतीला २२० जागा मिळतील असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंचा १४ वर्षानंतर दिल्ली दौरा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -