घरमहाराष्ट्रपीएमसी खातेदारांसाठी गुड न्यूज; आरबीआयने १० हजारापर्यंत मर्यादा वाढवली

पीएमसी खातेदारांसाठी गुड न्यूज; आरबीआयने १० हजारापर्यंत मर्यादा वाढवली

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने पंजाब अँड महाराष्ट्र को.ऑ. बँक (पीएमसी) च्या खातेदारांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. पीएमसी बँकेच्या खातेदारांची १००० रुपये काढण्याची मर्यादा आता १० हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह इतर सात राज्यांमध्ये मिळूम १३७ शाखा असलेल्या पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून आरबीआयने केवळ १००० रुपये बँकेतून काढण्याची मुभा खातेदारांना दिली होती.

- Advertisement -

नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना दिवसाला फक्त एक हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. बँकेच्या अनेक ठेवीदारांनी कर्ज घेऊन ती परत न केल्यामुळे बँकेवर आर्थिक संकट ओढवलं आणि त्यामुळेच बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात मंगळवारी सकाळी पीएमसी बँकच बंद झाल्याच्या अफवा उठल्या होत्या. मात्र, तसं काहीही नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं. असं असलं, तरी दिवसाला फक्त १ हजार रुपयांचंच बंधन टाकण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -