घरमहा @२८८रावेर विधानसभा मतदारसंघ - म.क्र.११

रावेर विधानसभा मतदारसंघ – म.क्र.११

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील रावेर (विधानसभा क्र.११) विधानसभा मतदारसंघ आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. रावेर या मतदारसंघात मराठा, लेवा, मुस्लीम, बौद्ध मतदारांची संख्या जास्त आहे. त्यासोबत गुर्जर, धनगर, माळी, कोळी, आदिवासी समाजही या ठिकाणी निर्णायक आहे. येथे लोकसभा व विधानसभेची समीकरणे नेहमीच वेगळी राहिली आहेत. लोकसभेत या मतदारसंघाने भाजपकडे कल दिल्याचा इतिहास आहे. खासदार रक्षा खडसे यांना रावेर विधानसभेतून ३९ हजारांचे मताधिक्य मिळाले असले तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत हे मताधिक्य ८ हजारांनी घटले आहे. त्यामुळे आताची विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. एमआयएम पक्षाने विवेक ठाकरे यांना उमेदवारी घोषित केल्याची माहिती मिळत असून शिवसेनेतून कोणीही इच्छुक दिसत नाही. या मतदारसंघात फैजपूर, यावल, किनगाव, सावदा, रसलपूर, रावेर, निंभोरा, ऐनपूर, तांदलवाडी, मस्कावद, चिनावल, न्हावी, भालोद, सांगवी, अट्रावल, अशी महत्वाची गावे येतात. या गावांचे मतदान महत्वपूर्ण ठरत असते.

मतदारसंघ क्रमांक : ११

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या
पुरुष मतदार – १,५१,७८६
महिला मतदार – १,४०,९७७
इतर – ०
एकूण मतदार – २,९२,७६३

- Advertisement -

विद्यमान आमदार : हरिभाऊ जावळे, भाजप

या दोन्ही तालुक्यांना केळी उत्पादक तालुका म्हणून ओळखले जाते. केळी संशोधन केंद्रदेखील येथे आहे. केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात येथे आहे. २०१४ -राष्ट्रवादीची आघाडी नसल्याचा फटका काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरींना बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गफ्फार मलिक यांनी ३१ हजार २७१ मते घेतली होती. त्यामुळे भाजपचे हरिभाऊ जावळे यांच्याकडून १० हजार मतांनी शिरीष चौधरींना पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी मात्र, काँग्रेसची आघाडी झाल्यास काँग्रेसचा उमेदवार भाजपला चांगली लढत देऊ शकत असल्याने यंदाची रावेरची लढत देखील चुरशीचीच होणार आहे. सूरुवातीच्या काळात काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांचे या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होते. त्यांच्या पश्चात या मतदारसंघावर भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रभाव निर्माण केला. जळगाव जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला मजबूत झाल्यानंतर रावेरमध्येही काँग्रेसचा प्रभाव कमी होत गेला.

रावेर मतदारसंघ आमदार हरिभाऊ जावळे

२०१४ विधानसभा परिस्थिती

हरिभाऊ जावळे – भाजप – ६५,९२२
शिरीष चौधरी – का‌ँग्रेस – ५५,९२२
गफ्फार मलिक – राष्ट्रवादी – ३१,२७१
प्रल्हाद महाजन – शिवसेना – १४,९२८


हे देखील वाचा – ४ रावेर लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -