घरताज्या घडामोडीअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिलासा; वसतिगृहात विनाशुल्क प्रवेशासाठी उत्पन्न मर्यादेत वाढ

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिलासा; वसतिगृहात विनाशुल्क प्रवेशासाठी उत्पन्न मर्यादेत वाढ

Subscribe

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी विभागाच्या निर्णयाबाबत माहिती दिली.

अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी आणि ज्यू समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेश घेण्यासाठी आता कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी विभागाच्या निर्णयाबाबत माहिती दिली. या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये खोलीभाडे, पाणी, वीज इत्यादी सुविधांचे शुल्क पूर्णपणे माफ असेल, असे मलिक यांनी सांगितले.

विविध सुविधा विनाशुल्क

आतापर्यंत वसतीगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख रुपये इतकी होती. मात्र, आता ही मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढवल्याने उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामधील विविध सुविधा विनाशुल्क उपलब्ध होणार आहेत. कुटुंबाचे उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले विद्यार्थीही वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असून त्यांना माफत दरात या सुविधा देण्यात येतील, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना लाभ

यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागात अल्पसंख्याक विकास विभागाची सध्या मुलींची २३ वसतीगृहे आहेत. मुलांची काही वसतीगृहे सुरु होत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन निर्णयाचा लाभ होईल. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लॉकडाऊनविषयक नियमांचे पालन करुन तसेच शैक्षणिक कार्यवाही सुरु झाल्यानंतर ही वसतिगृहे चालू करण्यात येतील, असेही मलिक यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -