घरमहाराष्ट्रFood Poisoning : अकोल्यात शालेय पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Food Poisoning : अकोल्यात शालेय पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Subscribe

अकोला : राज्यातील मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. शाळेत देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची खिचडी खाल्ल्यानंतर 10 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना अकोला शहरातील मनपाच्या शाळेत घडली आहे. या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

अकोल्यामधील शिवसेना वसाहतीतील 26 क्रमांकाच्या शाळेतील मंगळवारी (27 फेब्रुवारी) 10 विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ झाल्यामुळे त्यांना अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांना उलट्या होण्याचे कारण पाहण्यासाठी खिचडीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदरााचे अवशेष सापडल्याचे उघड झाले. यामुळे शालेय प्रशासन आणि पोषक आहारात होणारा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha Election 2024 : जागावाटपाबाबत महायुतीची बैठक; अमोल कोल्हेंचा मतदारसंघ दादांकडे?

राज्यभरातील शाळेत दुपारीच्या वेळी पोषण आहार दिले जाते. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी हा पोषण आहार दिला जातो. पण या पोषण आहारामुळे मुळांना विषबाधा झाली आहे. यामुळे खिचडीतील मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने पालकासह अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची पालिका विभाग आणि शालेय शक्षिण विभागावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -