घरताज्या घडामोडीAU म्हणजे.., रिया चक्रवर्तीने आधीच केला होता खुलासा

AU म्हणजे.., रिया चक्रवर्तीने आधीच केला होता खुलासा

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीवर गंभीर करण्यात आले होते. भाजपा आमदार नितेश राणेंनी हे प्रकरण लावून धरलं होतं. तसेच आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीला ४४ फोन केले, असेही आरोप करण्यात आले.

या आरोपानंतर आता रिया चक्रवर्तीची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मुलाखतीत AU कोण?, याबद्दल रिया चक्रवर्तीने स्पष्टीकरण दिलं आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने रिया चक्रवर्तीची मुलाखत घेतली होती. यावेळी AU म्हणजे कोण याबाबत रियाने खुलासा केला आहे.

- Advertisement -

रिया चक्रवर्ती त्या मुलाखतीत सांगते की, माझी मैत्रिण आहे अनाया उदास, तिचं नाव सेव्ह आहे AU म्हणून. परंतु यांनी त्याचं आदित्य उद्धव बनवलं आहे. मी, माझ्या मैत्रिणीने आणि आदित्य ठाकरेंनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. मी आदित्य ठाकरेंशी कधी बोलले नाही, त्यांना ओळखत नाही, त्यांना कधीही भेटले नाही आणि त्यांचा नंबरही माझ्याकडे नाही. माझा त्यांच्यासोबत काहीही संबंध नाहीये, असं रिया चक्रवर्ती म्हणाली.

- Advertisement -

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत काल सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांचा चौकशी अहवाल सादर केला. यानुसार, सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला एयू नावाने ४४ कॉल्स आले होते. एयू म्हणजे आदित्य, उद्धव ठाकरे असा बिहार पोलिसांचा दावा आहे, असं राहुल शेवाळेंनी लोकसभेत सांगितलं. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


हेही वाचा : दिशा सालिअनप्रकरणी आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या रडारवर, विधानसभेत गोंधळ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -