घरमहाराष्ट्रनागपूरमुंबईत पाच वॉर्डात उंदीर मारण्यासाठी 1 कोटी खर्च, आशिष शेलारांच्या आरोपाची होणार...

मुंबईत पाच वॉर्डात उंदीर मारण्यासाठी 1 कोटी खर्च, आशिष शेलारांच्या आरोपाची होणार चौकशी

Subscribe

नागपूर : मुंबई महापालिकेने पाच वॉर्डात उंदीर मारण्यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च केल्याचा आरोप भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला. त्यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या आरोपाची समिती नेमून चौकशी करणार असल्याची घोषणा केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रमेश कोरगावकर यांनी राज्यात विशेषतः मुंबई, ठाण्यात साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल प्रश्न विचारला होता. यावेळी शेलार यांनी उपप्रश्न विचारताना मुंबईत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना उंदीर मारताना कधी कुणी पाहिले नाही. मात्र, तरीही महापालिकेने पाच वॉर्डात उंदीर मारण्यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च केला. या एक कोटीत किती उंदीर मारले आणि उंदीर मारणाऱ्या कंत्राटाची चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

- Advertisement -

त्यावर सावंत यांनी मुंबई महापालिकेने एक कोटी खर्चून उंदीर मारले असतील तर त्याच्या खोलात जावे लागेल, असे सांगत याप्रकरणी समिती नेमून चौकशी करणार असल्याचे जाहीर केले.

गोवरची साथ पूर्णपणे नियंत्रणात
राज्यातील 142 ठिकाणी तसेच शहरी भागात गोवर आजाराचा उद्रेक झाला आहे. ठाणेभिवंडीमालेगाववसई विरार अशा विविध ठिकाणी  उपयोजना करण्यासाठी कृती दलाची (टास्क फोर्स) निर्मिती केली आहे. या माध्यमातून  विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागाने लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. आता राज्यातील गोवरची साथ पूर्णपणे नियंत्रण असून ती येत्या 10 ते 15 दिवसांत आटोक्यात आणणार असल्याचे सावंत यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. गोवर नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून बालक संख्येच्या दुप्पट लसी उपलब्ध असल्याची माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

- Advertisement -

दोन महिन्यांत भरती प्रक्रिया होणार पूर्ण
राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून येत्या दीड-दोन महिन्यात ही भरती पूर्ण होऊन आरोग्य सेवेला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होईल, असेही सावंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यावेळी समाजवादी पक्षाचे अबू असीम आझमी, रईस शेख, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या यामिनी जाधव आदींनी उपप्रश्न विचारले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -