घरमहाराष्ट्र'साडेचार वर्षात केले नाही, ते तीन महिन्यात काय करणार' - रोहित पवार

‘साडेचार वर्षात केले नाही, ते तीन महिन्यात काय करणार’ – रोहित पवार

Subscribe

शेतकऱ्यांचे कम्बर्डे मोडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. यांचे उद्दिष्ट सर्वसाधारण व्यक्तीला मदत करायचे नाही तर व्यापारी वर्गाला मदत करण्याचे असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर युती सरकारकडून मोठमोठी आश्वासने देण्यात येतील, पण ज्यांनी साडेचार वर्षात काही विकासकामे केली नाही ते लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ३ महिन्यात काय करणार, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी केली आहे. निर्धार परिवर्तनाचा संपर्क यात्रेत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुक्यात आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी, नागरिक सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांची फसवणूक सुरु

देशामध्ये ६० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात आणि त्यांचा व्यवसाय शेती आहे. दुष्काळ, जनावरांना लागणारे पाणी-चारा, नापिकी या नुकसानीचा मोबदला हा सरकारकडून मिळाला पाहिजे. पण यावर युती सरकार टाळाटाळ करतांना दिसून येते, ही शेतकऱ्यांची चक्क फसवणूक आहे. ज्या कांद्याला अडीच हजार रुपयांचा मोबदला मिळाला पाहिजे. त्याला २ ते ३ रुपये अनुदान मिळते. हरभरा, तूर यासाठी शासनाने नियोजन केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ३ ते ४ हजार कोटींचे नुकसान झाले, असा घणाघाती आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

- Advertisement -

व्यापारी वर्गाला मदत करणे सरकारचे उदिष्ट

आज कर्जमाफी कोणाची झाली? राज्यात एकही शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही. मात्र, आज देशभरात शेतकऱ्यांकडून २० हजार कोटींची वार्षिक विमा रक्कम विमा कंपन्यांनी घेतली. विमा कंपन्यांना तब्बल १० हजार कोटींचा नफा झाला आहे,  हे सरकार विमा कंपन्यांचा नफा वाढविण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्यांचे कम्बर्डे मोडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. यांचे उद्दिष्ट सर्वसाधारण व्यक्तीला मदत करायचे नाही तर व्यापारी वर्गाला मदत करण्याचे आहे, असाही आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादीची सत्ता ही लोकांची सत्ता

अहमदनगरचे भाजप आमदार शेतकऱ्यांना म्हणतात, जर जनावरांना चारा-पाणी नसेल तर त्यांना पाहुण्यांकडे नेऊन द्या, अशी वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यांची या भाजप-शिवसेना युती सरकारने आणली, असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. नगरपरिषद, महानगरपालिका जिथे सर्वसाधारण माणसाचा मुलगा शिकायला जातो, त्या शाळा आज हे सरकार बंद करायला निघाले आहे. हे सरकार जातीजाती, धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीची सत्ता ही लोकांची सत्ता आहे, म्हणून लोकांची सत्ता राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – 

शरद पवारांचे ऋण फेडण्यासाठी रोहित पवारांना शिरुरमध्ये उमेदवारी द्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -