घरताज्या घडामोडीमविआ सरकारला बदनाम करण्यासाठी ईडीची कारवाई, सचिन सावंत यांचा केंद्रावर आरोप

मविआ सरकारला बदनाम करण्यासाठी ईडीची कारवाई, सचिन सावंत यांचा केंद्रावर आरोप

Subscribe

ईडीने मालमत्ता जप्त करताना ECIR व RUD का दिले नाही? सर्वोच्च न्यायालयात ३० जुलैला सुनावणी होती त्याचदिवशी समन्स कसे पाठवले?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील ईडीची कारवाई महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचं षडयंत्र असल्याचे काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करुन सरकारची बदनामी करण्याचा प्रकार सुरु असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. ईडीने देशमुखांना कारवाईचे कागदपत्र दिले नाही. यामुळे मोदी-शाह यांच्या आदेशाने कारवाई सुरु असल्याचे सचिन सावंत यांनी केला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात ज्या पद्धतीने समन्स बजावण्यात आला आहे. यामध्ये कोणतही अश्चर्य वाटण्याचं कारण नाही. देशमुख यांच्यावरोधातील कारवाई संपुर्ण राजनैतिक दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशाने चालली आहे. गेल्या ७ वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केवळ राजकीय दृष्टीकोणातून करण्यात येत आहे. देशातील विरोधी पक्षाचं जिथं जिथं सरकार आहे. त्या राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बदनामीसाठी केला जात आहे. महाराष्ट्राती महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये कुठलीही शंका नाही असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

- Advertisement -

ज्या नियमांवरती ईडी काम करते त्या नियमांचे उल्लंघन स्वतःच ते करत आहेत. एकंदर ज्यावेळी एखादी आरोपीची प्रॉपर्टी जप्त केली जाते त्यावेळी त्याच्यावर ईसीआयआर (ECIR) जो ईडीने नोंदवला आहे आणि आरयूडी (RUD) ज्या कागदपत्रांवर ही केस बनली आहे. त्यांना संशय आहे ती कागदपत्रे आणि ईसीआयआरची प्रत अनिल देशमुख यांना देण्याची आवश्यकता आहे. त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली परंतू त्यांना ही कागदपत्र देण्यात आले नाहीत. का नाही दिले कागदपत्रे ईडीलाही नियमांचे बंधन आहे.

- Advertisement -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार ३० जुलैला न्यायालयात मागणी करत आहेत की, आम्हाला संरक्षण द्यावे त्यावर सुनावणी सुरु आहे. तोपर्यंत हे चौकशीसाठी थांबू शकत नव्हते? असा सवाल करत हा बदनामी करण्याचा आणि राजकीय षडयंत्र असल्याचे उघडकीस आलय असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -