घरदेश-विदेशCBSE 10th Result 2021: १० वीच्या विद्यार्थ्यांनी ही कागदपत्रं ठेवा तयार, आठवड्याभरात...

CBSE 10th Result 2021: १० वीच्या विद्यार्थ्यांनी ही कागदपत्रं ठेवा तयार, आठवड्याभरात निकाल होईल जाहीर!

Subscribe

CBSE 10th Result 2021 Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावीचा निकाल नुकताच जाहीर केला, त्यानंतर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. यावर मंडळाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, सीबीएसईच्या १० वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करु शकतात. याचपार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी त्यांचा रोल नंबर आणि इतर कागदपत्रं तयार ठेवावीत. यातचं निकालासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या.

‘या’ वेबसाईटवर जाहीर होईल निकाल

सीबीएसईचा १० वीचा निकाल cbseresults.nic.in, cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाईल.
याव्यतिरिक्त डिजिटल प्लॅटफॉर्म डिजिलॉकर वेबसाईट digilocker.gov.in किंवा अॅपवरही तुम्ही निकाल पाहू शकता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा कोणतेही एडमिट कार्ड जाहीर केले नाही. मात्र, निकालासाठी रोल नंबर आवश्यक असेल.

- Advertisement -

निकाल पाहण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

बोर्डाकडून १० वीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहितींच्या आधारे निकाल पाहता येईल.

असा जाणून घ्या तुमचा रोल नंबर

१) सर्वप्रथम CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा.

- Advertisement -

२) यानंतर होम पेजवरील ‘Roll Number Finder 2021’ लिंकवर क्लिक करा.

३) यानंतर तुमच्या समोर सर्व्हर निवडण्याचा ऑप्शन असेल. सर्व्हर निवडल्यानंतर Continue वर क्लिक करा.

४) या यानंतर Class 10th सिलेक्ट करा.

५) सर्व माहिती भरा आणि सर्च डेटावर क्लिक करून तुम्हाला रोल नंबर मिळेल.

असा पाहा निकाल

निकाल जाहीर झाल्यानंतर १० वीची लिंक अधिकृत वेबसाइटवर अॅक्टिव्ह केली जाईल. त्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता.

१) अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा.

२) होमवरील ‘CBSE Results’ या लिंकवर क्लिक करा.

३) आता, ‘CBSE Class 10 Result 2021’ या लिंकवर क्लिक करा.

४) विचारलेली ओळखपत्रे प्रविष्ट करा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.

५) यानंतर तुमचा सीबीएसईचा १० वीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

६) तो डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट देखील घेऊ शकता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -