घरमहाराष्ट्रभिडेंचे वक्तव्य हिंसाचाराला प्रवृत्त करणारे - हेमंत टकले

भिडेंचे वक्तव्य हिंसाचाराला प्रवृत्त करणारे – हेमंत टकले

Subscribe

महाराष्ट्रात हिंसाचाराच्या घटना वाढीस लागल्या असून सरकारने वेळीच यावर उपाययोजना केली पाहिजे. तसेच ज्यांची वक्तव्ये हिंसाचारास प्रवृत्त करतात त्यावर आळा घातला पाहिजे, अशी मागणी आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. धुळे जिल्ह्यात जमावाकडून पाच जणांची झालेली निर्घुण हत्या दुर्देवी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी राज्यातील वाढत्या हिंसाचारावर विधानपरिषदेत नियम ९७ अन्वये भाष्य केले. आणि हा वाढता हिंसाचार रोखण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावी, अशी मागणीही त्यांनी केली. “भिडे हे धारकरी आहेत. मागील वर्षी त्यांनी वारीमध्ये शस्त्रधारी लोक उभे केले होते आणि यावर्षी वारीत तलवारी घेवून धारकरी सहभागी होतील, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य हिंसाचाराला प्रवृत्त करत नाही का? असा प्रश्न टकले यांनी उपस्थित केला.

राज्यात वाढलेले हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. या प्रवृत्तींना जात-पात आणि धर्म यांचे बंधन नाही. आरक्षणाचाही प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आरक्षणावर आणि हिंसाचारावर अभ्यास करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विदयापीठ असून या त्याचा करावा किंवा तिथे अशाप्रकारचा अभ्यास होत नसेल तर सदर विषयातील तज्ज्ञ नेमून अशाप्रकारचा अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी टकले यांनी केली. यावर देखरेख ठेवण्यासाठी दोन्ही सभागृहाची एक समिती नेमावी अशी मागणीही आमदार हेमंत टकले यांनी केली.

- Advertisement -

राज्यात आज वेगवेगळ्या प्रसंगातून माणसे मारली जात आहेत. माणसे मारून त्यांचे तुकडे-तुकडे केले जातात आणि ते फ्रिजमध्ये ठेवून नंतर ते फेकले जात आहेत इतकी क्रुरता वाढली आहे. हे सगळे बेरोजगारीमुळे होतेय का? पाच-दहा हजार रुपयांमध्ये माणसाच्या जीवाची किमंत ठरत असेल तर आपण कुठल्या दिशेला जात आहोत, अशी संतप्त भावना आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.

विजय तेंडूलकरांना हिंसाचाराच्या अभ्यासासाठी फेलोशिप

राज्यात हिंसाचाराच्या प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रवृत्तींना जातपात आणि धर्म नाही. अशा वाढत्या प्रवृत्या बघितल्यानंतर आमदार हेमंत टकले यांनी २५ वर्षापूर्वीची आठवण सांगितली. त्यावेळी हिंसाचार वाढलेला असताना ज्येष्ठ नाटककार विजय तेंडूलकर यांनी सरकारकडे हिंसाचाराबाबत अभ्यास करण्याची परवानगी मागितली होती. त्यावेळी त्यांना दिल्लीतील जेएनयू विद्यापीठामार्फत फेलोशिप मिळाली होती असे टकले यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -