घरमनोरंजनराखी म्हणतेय, 'लग जा गले' !

राखी म्हणतेय, ‘लग जा गले’ !

Subscribe

राखी सावंत तिच्या इन्स्टा अकाऊंटवर कायम अॅक्टीव्ह असते. ती सतत काही ना काही शेअर करतच असते. आताही तिने गुरुवारी रात्री उशिरा दोन व्हिडिओ शेअर केले आहेत.

आयटम गर्ल राखी सावंत सध्या उदास असून ती त्या नाराजीच्या सूरातच ‘लग जा गले!’ असं म्हणतय. तसं यात धक्का बसण्यासारखं काही नसेलचं म्हणा. कारण राखी नेहमीच चर्चेत राहण्यासाठी काही ना काही करत असते, असंच तुम्हाला वाटलं असेल. आता ती चक्क कोणाला तरी लग जा गले असं म्हणतेय. आता कोणाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ? पण हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ती कळेल.

- Advertisement -

व्हिडिओ केला इन्स्टावर शेअर

राखी सावंत तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन कायम अॅक्टीव्ह असते. ती सतत काही ना काही शेअर करतच असते. आताही तिने गुरुवारी रात्री उशिरा दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओत ती ‘लग जा गले’ या गाण्याच्या ओळी गुणगुणतेय. म्हणजे काहीसं डबस्मॅशच करते असं म्हणायला हवं. तर दुसऱ्या व्हिडिओत ‘करवटे बदलते रहे’ हे गाणे आहे. दोन्ही जुन्या गाण्याचे तिने लिपसिंक केले आहे.

- Advertisement -

 

राखीचे ३ लाख फॉलोअर्स

राखी सावंत मीडिया स्टंट करते, असे जरी अनेक जण म्हणत असले तरी तिच्या चाहत्यांची संख्या देखील कमी नाही. इन्स्टावर तिचे ३ लाखांच्या घरात फॉलोवर्स आहेत.  ती या अकाऊंटवरुन तिच्या फॅन्सना इंटरटेन करत असते.

स्टेज शोमध्ये व्यग्र

राखी सावंतने आतापर्यंत हिंदी, भोजपुरी सिनेमातील आयटम साँगमधून काम केले आहे. शिवाय ती स्टेज परफॉर्मन्ससाठी ही प्रसिद्ध आहेत. येत्या २१ जुलैला तिचा दिल्लीत शो असून ती या शोच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -