घरमहाराष्ट्र'बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी पुढे यावे'

‘बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी पुढे यावे’

Subscribe

आजपासून पुन्हा एकदा विशेष नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. या विशेष नोंदणी अभियानात बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी कामगारांनी पुढे यावे, असे आवाहन कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

कामगार विभागाने राबविलेल्या दोन विशेष नोंदणी अभियानात साडे तीन लाखाहून अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. आजपासून पुन्हा एकदा विशेष नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. या विशेष नोंदणी अभियानाद्वारे राज्यातील जास्तीत जास्त बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य निश्चित करीत असताना अधिकाधिक कामगारांनी विशेष नोंदणी अभियानात बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना’च्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ कामगार मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीरंगम आदी उपस्थित होते.

हेही वाचा – कामगारांच्या वेतनरकमेत बीव्हीजी कंपनीकडून अफरातफर

- Advertisement -

नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘विशेष नोंदणी अभियाना’ला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या टप्प्यातील नोंदणी अभियानात २ लाख २४ हजार ५७७ बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण करण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी अभियानात १ लाख ४३ हजार २७४ बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण करण्यात आली होती. पहिला आणि दुसरा टप्पा एकूण ४० दिवसांचा होता. विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत २८ योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार आहे. तिसरे विशेष नोंदणी अभियान आजपासून सुरु झाले असून महिनाभर हे अभियान सुरु असणार आहे. औरंगाबाद, सातारा, सांगली, नांदेड, लातूर, भंडारा, अकोला, जळगाव, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, वर्धा, गडचिरोली, बुलडाणा अशा १७ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा – महापालिकेच्या कामगार भरतीमध्ये सावळा गोंधळ

- Advertisement -

‘या’साठी नोंदणी ठरणार महत्त्वाची

अटल विश्वकर्मा सन्मान योजना आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजनेची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात येत असून या अभियानादवारे या योजनांचा लाभ कामगारांना मोठया प्रमाणावर होणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्यावर भर देण्यात येत आहे. कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी करणे याला प्राधान्य देण्यात येत आहे.


हेही वाचा – राजकारणात ‘स्टार्ट अप मॉडेल’ हवं – संभाजी पाटील-निलंगेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -