घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत भाजपला मोठा धक्का; धैर्यशील महिते-पाटलांचा राजीनामा

Lok Sabha 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत भाजपला मोठा धक्का; धैर्यशील महिते-पाटलांचा राजीनामा

Subscribe

माढा (सोलापूर) – लोकसभा निवडणुकीचा प्रचार, सभा, मिरवणुका सुरु झालेल्या असताना भारतीय जनता पक्षाला सोलापूरमध्ये मोठे खिंडार पडले आहे. माढा लोकसभेसाठी भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे नाराज असलेले धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. नुकतीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

 14 एप्रिलला राष्ट्रवादीत प्रवेश; धैर्यशील मोहिते-पाटल्यांच्या भेटीवर पवार म्हणाले…

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कालच (गुरुवार) शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार गटातील प्रवेशावर वेट अँड वॉच असे सांगत अधिक बोलणे टाळले. मात्र त्यांनी भाजपच्या विविध पदांचा राजीनामा 10 एप्रिल रोजीच दिल्याचे आता समोर आले आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले होते, की राज्यातील राजकीय परिस्थिती दररोज बदलत आहे. धैर्यशील यांच्या पक्ष प्रवेशावर ते म्हणाले की, मोहित कुटुंबीयांच्या संमतीनेच धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत. 14 एप्रिल रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होईल.

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, आणखी अनेक नेते हे पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. लोकांशी बांधिलकी कायम राखायची असेल तर त्यांना पक्ष बदलण्याशिवाय पर्याय नाही असे त्यांना वाटत असेल त्यामुळेच कशाचीही अपेक्षा न ठेवता विविध पक्षातील लोक आमच्या पक्षात येत आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : Sharad Pawar in Pune : मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यात फरक; शरद पवारांचा रोख कोणाकडे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -