घरक्राइमDahisar Firing : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येवेळी सव्वाचार मिनिटांत काय घडले? वाचा सविस्तर

Dahisar Firing : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येवेळी सव्वाचार मिनिटांत काय घडले? वाचा सविस्तर

Subscribe

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली आहे. पण या घटनेच्या सव्वा चार मिनिटांमध्ये नेमके काय घडले? याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी (ता. 08 फेब्रुवारी) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्याभरात राजकीय क्षेत्रात तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दहिसर-बोरिवली येथील सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले मॉरिस नोरोन्हा यांनी फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच घोसाळकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. (Dahisar Firing: What happened in four and a half minutes during killing of Abhishek Ghosalkar)

हेही वाचा… Abhishek Ghosalkar Murder Inside Story: मॉरिसने तुरुंगात रचला अभिषेक यांच्या हत्येचा कट?

- Advertisement -

धक्कादायक बाब म्हणजे मॉरिसने यानंतर गोळ्या झाडून आत्महत्या केली. पण मॉरिसने फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच घोसाळकरांवर गोळ्या का झाडल्या? याबाबत आता प्रश्न निर्माण झाला आहे. पण या घटनेच्या सव्वाचार मिनिटांमध्ये नेमके काय घडले? याबाबतची माहिती आता समोर आली आहे. पोलिसांच्या तपासातून त्या सव्वा चार मिनिटांचा थरार उघड झाला आहे.

फेसबुक लाइव्हदरम्यान अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा दोघेच कार्यालयात होते. त्यावेळी मॉरिस याने ट्रायपॉड लावला. त्यानंतर त्याने फेसबुक लाइव्ह सुरू केले. फेसबुक लाईव्ह सुरू असताना दोन ते तीनदा तो उठून कॅमेऱ्याच्या बाजूला गेला. लाइव्ह सुमारे चार मिनिटे सुरू होते. त्यानंतर मॉरिस याने बंदुकीने पाच गोळ्या घोसाळकर यांच्या दिशेने झाडल्या. यापैकी चार गोळ्या त्यांना लागल्या.

- Advertisement -

घटनास्थळी अचानक गोळ्यांच्या आवाज आला. यामुळे नागरिकांची पळापळ झाली. घोसाळकर खाली कोसळले. गोळीबारानंतर मॉरिस याने दरवाजाकडे धाव घेतली. बाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये मॉरिस दोन ते तीन सेकंद घोसाळकर यांना पाहताना दिसत आहे. त्यानंतर त्याच बंदुकीने मॉरिस स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बंदुकीतील गोळ्या संपल्याने तो पहिल्या मजल्यावर धावला. त्याठिकाणी पुन्हा बंदूक लोड केली. त्यानंतर गोळी झाडून आत्महत्या केली. सव्वाचार मिनिटांचा हा थरार आता पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे.

फेसबुक लाइव्हमध्ये दोघे काय बोलले?

चार मिनिटांच्या या फेसबुक लाइव्हमध्ये मॉरिस सुरुवातीला गॉड ब्लेस यू म्हणत घोसाळकरांना बोलण्यास सांगतो. त्यावर घोसाळकर आज मॉरिस भाईंसोबत लाइव्ह येण्याची संधी मिळाली, हे पाहून अनेक जण सरप्राइज होतील असे म्हणतात. घोसाळकर बोलत असतानाच मॉरिसमध्ये येतो आणि आज बहोत लोग सरप्राइज होंगे, असे म्हणतो. काही गोष्टी एकतेसाठी, चांगले काम करण्यासाठी होतात, असे बोलून पुन्हा घोसाळकरांना दोन शब्द बोलण्याचा आग्रह करतो. घोसाळकर यांनी बोलताना, एक चांगली दिशा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. साडी, रेशन वाटण्यासोबतच मुंबई ते नाशिक बस प्रवास सुरू करणार आहोत. नवीन संकल्प घेत एकत्र काम करणार आहोत. आमच्यात, कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमज होते. मात्र आता एकत्र येत काम करणार असे ते अभिषेक म्हणाले. बोलणे झाल्यानंतर उठून जात असतानाच त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या गेल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -