घरमहाराष्ट्रदिवा विझताना मोठा होतो...; संजय राऊतांचं राज ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर

दिवा विझताना मोठा होतो…; संजय राऊतांचं राज ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारच्या ठाण्यातील उत्तर सभेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला संजय राऊत ट्विट करत खोचक शब्दांत उत्तर दिलं. दिवा विझताना मोठा होतो, असं खरमरीत प्रत्युत्तर राऊत यांनी दिलं आहे.

मशिदीवरील भोंग्यावरुन देशभरात वाद सुरु आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची भूमिका घेतली होती. अचानकपणे काही लोक, जो भाजपचा भोंगा आहे, ईडीची कारवाई ज्यांच्यावर जी होत होती, याबाबद भाजपने त्यांना सूट दिली आहे, अभय दिलं आहे. त्यानंतर हा भोंगा सुरु झाला आहे. दीड वर्ष हा भोंगा बंद होता. हिंदुत्त्वाबद्दल आम्हाला शिकवू नका. जेव्हा जेव्हा हिंदुत्वावर हल्ला झाला, तेव्हा भाजप, त्यांचे भोंगे समोर आले नव्हते, आम्ही आलो होतो. बाळासाहेब ठाकरे आणि पूर्ण शिवसेना हिंदुत्वासाठी लढत आली आहे. मी कालच बोललो की दिवा विझत असतो तेव्हा मोठा होतो, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

अल्टीमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्येच होती. बाळासाहेबांनी दहशतवाद्यांना देखील ताकीद दिली होती. हा जो भोंगा वाजतोय, भाजपचाच भोंगा आहे सर्वांना माहिती आहे. आमच्या नकला करा, आमच्याविषी खोटं बोला, पण महाविकास आघाडी भक्कम आहे. नैराश्यातून हे भोंगे वाजत आहेत. त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

संजय राऊत शिवराळ भाषेत वापरतात असं म्हणाले, हो बरोबर आहे. खरं म्हणजे मी ज्यासाठी शिवराळ भाषा वापरली आहे, त्या भाषेचं कौतुक वाटायला हवं होतं. कारण ते मराठी अभिमानी म्हणून ते कालपर्यंत वावरत होते. मराठी अस्मितेची, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत, इसवेना नाही, अशी भूमिका घेऊन ते राजकारणात आले. किरीट सोमय्या या माणसाला तुम्ही म्हणताय मी शिवराळ भाषा वापरली आहे. त्याचा मला आणि इशवसेना गर्व वाटतो. या विषयावर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंना फार महत्त्व देऊ नका, योग्य वेळी उत्तर देणार – अजित पवार


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -