घरमहाराष्ट्रराज ठाकरेंना फार महत्त्व देऊ नका, योग्य वेळी उत्तर देणार - अजित...

राज ठाकरेंना फार महत्त्व देऊ नका, योग्य वेळी उत्तर देणार – अजित पवार

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या ठाण्याच्या उत्तर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांची नक्कल करत टीका केली. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांना फार महत्त्व देऊ नका, योग्य वेळी उत्तर देणार, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी बुधवारी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशई बोलताना राज ठाकरेंवर भाष्य केलं. “मी आज धनंजय मुंडेंना भेटायला आलो आहे. त्यांना फार महत्त्व देऊ नका. माझ्या दृष्टीने धनंजय मुंडेंची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. माझा सहकारी रुग्णालयात आहे, त्याला मी भेटायला आलो आहे. दुसऱ्या प्रश्नांची उत्तरं मी योग्यवेळी देईन, त्या बद्दल काळजी करु नका. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे,” असं ्जित पवार म्हणाले.

- Advertisement -

धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा झटका आलेला नाही

धनंजय मुंडेंना सौम्य हृदयविकाराचा झटका आला नव्हता, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्यांची प्रकृती बरी आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं आहे. ज्या बातम्या पसरवल्या गेल्या तसं काहीही झालेलं नाही. त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका वगैरे काहीही आलेला नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी दोन ते तीन दिवस धनंजय मुंडेंना रुग्णालयातच ठेवणार असल्याचं सांगितलं. आज दुपारी आयसीयूमधून स्पेशल रुममध्ये शिफ्ट करतील. थोडे दिवस विश्रांती घ्यायला सांगितलं आहे. काल त्यांना पक्ष कार्यालयात आणि शरद पवार यांच्याकडे असताना अचानक भोवळ आल्यासारखे झाले, त्यानंतर ते बेशुद्ध झाले. रुग्णालयात आणलं तेव्हा देखील ते बेशुद्ध होते. थोड्यावेळाने ते शुद्धीत आले. त्यांना कोणती पथ्य सांगितलेली नाहीत. त्यांचं कुटुंब त्यांच्या सोबत आहे. घाबरण्याचं कारण नाही. काही गोष्टींची बंधनं पाळावी लागतील असं सांगत तुम्ही जेव्हा समाधानी व्हाल तेव्हाच यांना सोडा असं मी डॉक्टरांना सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.


हेही वाचा – राज ठाकरेंचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा?; आव्हाडांचा जोरदार पलटवार

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -